नागपूर ०२ ऑक" />
नागपूर ०२ ऑक्टो
प्रसिद्ध स्तंभलेखक आणि समाजाभिमुख विचारवंत प्रवीण बागडे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री नवयुग/पं. बच्चराज व्यास विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका बुद्धवासी शालीनी मोरेश्वर बागडे वय वर्षे ७८ यांचे ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार नारा दहन घाट, जरीपटका, नागपूर येथे करण्यात आला. त्यांच्या मागे मुलगा ललित, प्रवीण, आणि नितीन (बालू) तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बागडे कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
साहित्य, समाजकारण आणि जनजागरण क्षेत्रात आपल्या लेखणीद्वारे महत्वाचे योगदान देणारे प्रवीण बागडे यांना मिळालेला हा वैयक्तिक आघात अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या मातोश्रींच्या निधनाने समाजातील एक प्रेमळ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही, परंतु त्यांच्या मुलांमार्फत केलेले कार्य हेच त्यांचे खरे स्मारक ठरेल. या दुःखद प्रसंगामुळे बागडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.