पुणे येथील मराठा समाजाने घेतलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय : " /> पुणे येथील मराठा समाजाने घेतलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय : डॉ. पियूष साळुंखे पाटील
IMG-LOGO
Home सामाजिक पुणे येथील मराठा समाजाने घेतलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय : डॉ. पियूष साळुंखे पाटील
सामाजिक

पुणे येथील मराठा समाजाने घेतलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय : डॉ. पियूष साळुंखे पाटील

May 2025 315 Views 0 Comment
IMG

पुणे येथील मराठा समाजाने घेतलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय : डॉ. पियूष साळुंखे पाटील

सांगोला प्रतिनिधी : 

महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस महिला व मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. आपल्या मुली जर दिल्या घरी सुखी नसतील तर काय करायची ही श्रीमंती आणि पोकळ बडेजावपणा असा संताप व्यक्त करीत, पुणे येथील मराठा समाजाने हुंडा मागणाऱ्या कुटुंबा बरोबर यापुढे कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही हा आणि इतर ठराव अभिनंदनीय आहेत असे मत युवा नेते डॉ. पियूष साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

   जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत अशी मागणी करून मानसिक आणि शारिरीक छळामुळे वैष्णवी हगवणेला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबाला लग्नात 51 तोळं सोनं, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली असल्याबाबत ही सांगितले जात आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याप्रकरणी पुण्यात मराठा समाजाची बैठकीमध्ये मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यात होणारी प्रथा परंपरा यावर चर्चा झाली.

पुण्यातला मराठा समाज यापुढे हुंडा मागणाऱ्या कुटुंबा बरोबर कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही, असा ठराव पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच अनेक समाजहिताचे निर्णय घेण्यात आले. लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी असं मत मांडण्यात आलं. समाज म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यावे लागेल. मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची बदनामी होते आहे. जाणीव पूर्वक मराठा समाज टार्गेट होतो आहे का? विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे.लग्नाचे प्रदर्शन होत आहे. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून आपल्या मुली साठी एकत्रित आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपण पण केले पाहिजे हा हट्ट नको, प्री-वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडे प्रवृत्ती आहे. मुलीला शिकवा,तिला तुम्ही विश्वास द्या आई वडील भाऊ आम्ही सोबत आहोत.लग्न टीळे याचा राजकीय करण बंद झाले पाहिजे. भाषणबाजी बंद करा,लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा,कमी खर्चात करा.साखरपुडा हळद एकत्रीत केलं जावे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या सर्व विचारांना एक मराठा समाजातील कार्यकर्ते म्हणून माझा वैयक्तिक पाठिंबा जाहीर करतो व सांगोला तालुक्यातील मराठा समाज आणि बहुजन समाज यांना आवाहन करतो की आपल्या मुलीसाठी या गोष्टी आचरणात आणाव्यात. असेही डॉ. पियूष साळुंखे पाटील यांनी सांगितले आहे..