संघर्षयोद्धा.... प्रा.डॉ.भारत गरंडे
जब तक ना सफल हो नींद चैन" />
जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम..
संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम...
कुछ किये बिना ही जय जयकार नही होती...
कोशिश करने वालों की कभी हार नही होती...
या अवलिया प्रा.भारत गरंडे कडे पाहून या हरिवंशराय बच्चन यांच्या या ओळी आठवतात आणि मग वाटते यांच्या आई वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा मिळत नाही ज्यांना शाळेचा गंध नाही अशा दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि ग्रामीण भागाच्या संस्कृतीत बालपण घालवलेल्या पण आयुष्यामध्ये काहीतरी जगापेक्षा वेगळं करण्याची मनामध्ये ठेवलेली आस आणि त्याच्यासाठी चाललेली धडपड, परिस्थितीशी झगडत असताना मिळेल त्या ठिकाणी काम केले कुठे पार्टटाईम काम केले तरी कुठे मेडिकल दुकानात साफसफाई करण्यापासून काम करण्यास सुरुवात केली अत्यंत तुटपुंज्या पगारावर सन 2003 ते 2005 या सालात काम करून शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्याच्या नंतरच्या काळात पुढील शिक्षणासाठी गेल्यानंतर दिवसभर कॉलेज करून रात्री सहा ते अकरा या वेळेत सांगोला या ठिकाणी गजानन मेडिकल दुकानात काम करून मिळणार्या पैशातून स्वतःच्या शिक्षणाची सोय केली त्याच बरोबर कुटुंबाची देखील देखभाल केली गरीब कुटुंबातून जन्म घेऊन सुद्धा शिकण्याची उमेद आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी अकरावी बारावी शास्त्र शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारावी बोर्ड परीक्षेत त्यांनी चांगले गुण प्राप्त झाल्याने त्यांना सरकारी फार्मसी कॉलेजमध्ये डी. फार्मसी या पदविका अभ्यासक्रमासाठी त्यांची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मिरज मेडिकल सेंटर मिरज या ठिकाणी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
इसवी सन 2005-2007 या काळात त्यांनी ही पदविका पूर्ण करून आपला मेडिकल क्षेत्रात प्रवेश केला नंतर त्यांना लागलेला शिक्षणाचा ध्यास यामुळे ते पुढील शिक्षणासाठी बी. फार्मसी साठी त्यांनी सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे ता.सांगोला येथे प्रवेश घेतला या काळात त्यांनी शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले यांच्या मार्गदर्शनाने स्वतः शिकत असलेल्या कॉलेजमध्येच सहयाद्री झेरॉक्स सेंटर सुरू करून त्यांनी कमवा आणि शिका हा आदर्श सर्व विद्यार्थ्यांना समोर ठेवला त्याच्यातूनच मिळणार्या पैशातून सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे या कॉलेजमध्ये पुढील शिक्षण सुद्धा त्यांनी मोठ्या जिद्दीने कष्टाने पूर्ण केले
आणि आपण शिकत असलेल्या कॉलेजमध्येच प्राध्यापकाची नोकरी मिळवली.
सपने उनिके सच होते है जिनके सपनोंमे जान होती है//
पंखो से कुछ नही होता होसलो से उडान होती है....//
शिक्षण पूर्ण केल्यानंतर जी प्रा.भारत गरंडे यांनी जी गगनभरारी घेतली आहे ती खरंच समाजातील गरीब, होतकरू, बेरोजगार निराश त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुण मुलांसाठी आणि गावासाठी प्रेरणादायी अशीच आहे.
याच काळामध्ये त्यांनी नॅप्रॉड लाईफ सायंसेस प्रा. लि. मुंबई या कंपनी मध्ये सुद्धा तीन वर्षे दोन महिने नोकरी केली पण जी कष्टकरी,मेहनती असणार्या या भारतला स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते त्यांनी आपण ठेवलेले ध्येय गाठण्यासाठी स्वप्नाचा पाठलाग करणे काय सोडले नाही आणि काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांची नोकरीमध्ये मन रमत नव्हते . काहीतरी वेगळं निर्माण करण्याच्या प्रेरणेतून तीन वर्ष करत असलेली नोकरी सोडून दिली आणि स्वतः ची फार्मा कंपनी काढण्याचा निर्णय घेतला आणि आर्थिक भौतिक अडचणीचा सामना करून जिद्दी असणार्या भारत या उद्योजकांने मेट्रिक्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांच्या सहकार्याने स्वतःच्या फार्मा कंपनी इ.सन 2018 साली फार्माइंडिया लाईफ सायन्सेस प्रा. लि. बदलापूर, मुंबई या नावाने सुरू करून अनेक बेरोजगार मुलांना त्यांनी रोजगार तर उपलब्ध करून दिलाच पण फार्मा कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मेडिकल क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली आहे त्यांना या फार्मा कंपनीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा अर्थार्जन होत असून समाजात व मेडिकल क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
..जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले//
..तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा//
या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ओळी सार्थ ठरवल्या पहिल्यापासूनच गरिबीचे चटके सहन करत अनेक समस्यावर मात करत आलेल्या प्रा. भारत गरंडे यांनी उद्योजकास सामाजिक भान ठेवून आणि ज्या समाजात आपण वाढलो ज्या समाजामुळे आपण घडलो त्या मातीचे व मातेचे आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून त्यांनी सं 2011 साली एक सामाजिक फार्माइंडिया हेल्पलाइन सोसायटी या सेवाभावी संस्था स्थापन केली आणि या या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गरंडे परिवार सतत संस्था स्थापनेपासून सालाबादप्रमाणे एक विविध ठिकाणी शाळा, कॉलेज वस्तीग्रह या ठिकाणी जाऊन शालेय मुलांना शालेय उपयोगी साहित्य वह्या, पेन, पुस्तके इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे कार्य ते करत असतात त्याच बरोबर वस्तीगृहात निवासी असणार्या गरीब मुलांना खाऊ वाटप थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांना गरंडे परिवाराच्या वतीने दरवर्षी मायेची ऊब म्हणून वसतिगृहातील मुलांना पांघरण्यासाठी उबदार ब्लँकेट त्याचबरोबर मुलांना स्वेटर कान -टोप्या इत्यादी साहित्याचं वाटप करण्याचं पुण्य ते करत असतात
..देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे देता-देता एक दिवस देणार्याचे हात घ्यावेत..
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो की भावना नेहमीच प्रा.भारत गरंडे साहेब यांना स्वस्त बसू देत नव्हती याचेच प्रतिबिंब म्हणजे त्यांनी संपूर्ण जग जेव्हा कोविडच्या अधिपत्याखाली होतं गोरगरीब जनतेचे प्राण जात होते सगळीकडे डॉक्टरांचा औषधांचा तुटवडा भासत होता अशा काळामध्ये सुद्धा प्रा.भारत गरंडे यांनी स्वतःच्या फार्मा कंपनीच्या माध्यमातून लोकांना मोफत औषधे गोळ्या, सॅनियझर, मास्क देण्याच्या संकल्प केला आणि गोरगरीब जनतेची सेवा केली याच कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सोबत असणार्या सर्व डॉक्टर मित्रपरिवार यानी खूप मोठे योगदान दिले.
अलीकडच्या काळात तरुण शेतीकडे दुर्लक्ष करत आहे त्याचे कारणही तसेच आहे सतत पडणारा दुष्काळ आणि शेतीच्या पाण्याचा असणारा प्रश्न इतर नैसर्गिक आपत्ती यामुळे शेती नेहमीच नुकसानीची ठरत आहे त्यामुळे कृषिप्रधान असणार्या देशांमध्ये आज मितीस नोकरी करण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन कमि पगारावर काम करणे हा आजचा तरुण पसंत करत आहे यामुळे कृषिप्रधान देशात शेतीला दुय्यम स्थान निर्माण झाले आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ग्रामीण भागात घेरडी सारख्या गावातील मेटकरवाडी या ठिकाणी वास्तव्यास असणार्या आणि स्वतःच्या मालकीची जमीन असणार्या प्रा.भारत गरंडे यांनी वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक पिके त्यामध्ये आंबा, पेरू, लिंबू, डाळिंब हे फळांची आधुनिक पिके घेऊन त्यांनी या परंपरागत असणार्या दुष्काळी सांगोला भागामध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी शेतीचा आदर्श या भागातील शेतकर्यांपुढे ठेवला आहे.तरी नवीन जातीच्या पेरूची लागवड करून कमी खर्चात कमी पाण्यात फळबागेतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून शेतीकडे दुर्लक्ष करणार्या युवकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. अत्यंत कमी वयामध्ये ज्याने अनेक यशाची शिखरे सर केली प्रा.भारत गरंडे यांच्या मते
गरीब म्हणून जन्माला आलो असलो तरी
गरीब म्हणून मरणार नाही..
अशी जणू त्यांनी शपथ घेतली असून, हे उराशी बांधलेले स्वप्न त्यांनी कमी वयातच पूर्ण करून आयुष्यात तील परदेशवारी चे स्वप्न सुद्धा पूर्ण केले ते आतापर्यंत आपल्या मित्रपरिवारासह दोन वेळा मलेशिया, सिंगापूर व थायलंड इत्यादी ठिकाणी परदेशी अभ्यास दौरे करून आले आहेत
शेतीच्या माध्यमातून विविध बेरोजगार यांना तर रोजगार उपलब्ध करून दिलाच पण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाज प्रतिष्ठा मिळवत या त्यांच्या स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या मालकीची आजमितीस युनिकॉर्न सारखी टू व्हीलर व क्रेटा फोर व्हीलर व शेतीमध्ये सुधारणा राहणीमान उच्चप्रतीचे केले असून परिसरातील आणि तालुक्यातील लोकांसाठी प्रा.भारत गरंडे हे एक आदर्श बनले आहेत. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्या विषयात तज्ञ बनायचं स्वप्न उराशी बाळगून या वर्षी प्रा.भारत भाऊसाहेब गरंडे यांना मध्यप्रदेश मधील नामांकित आईईएस युनिव्हर्सिटी, भोपाळ या विद्यापीठाची फार्मासियुटिकल सायन्स विभागातून डेव्हलोपमेंट अँड व्हॅलिडेशन ऑफ स्टॅबिलिटी इंडिकेटिंग आर. पी. एच. पी. एल. सी. मेथड फॉर एस्टीमेशन ऑफ सोराफेनिब, एंजालूटामाईड अँड सायटाराबीन ड्रग्ज अँड इट्स फार्मासुटिकल फॉर्मुलेशन या विषयावर डॉक्टर ऑफ फिलॉसोफी (PhD) प्राप्त झाली आणि त्यानी हे देखील स्वप्न पूर्ण करून दाखवले याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे...
सिर्फ हंगामा खडा करना मेरा, मकसद नही मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए,
आग तेरे दिल मे सही या मेरे दिल मे सही
लेकिन आग लगनी चाहिये..
या भगतसिंग यांच्या ओळी त्यांनी सार्थ ठरवले आहेत
अशा या कर्तृत्ववान मित्राला त्याच्यामधील जिद्दीला,कष्टाला मनपूर्वक सदिच्छा!!!!
शब्दांकन-
प्रा.सुरेश वसंत लवटे
एम ए बी एड,
पत्रकारिता पदवीधर