लक्ष्मी दहीवडी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

&n" /> लक्ष्मी दहीवडी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

IMG-LOGO
Home आरोग्य लक्ष्मी दहीवडी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न
आरोग्य

लक्ष्मी दहीवडी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

December 2022 453 Views 0 Comment
IMG

लक्ष्मी दहीवडी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

 

सांगोला प्रतिनिधी

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व समस्त ग्रामस्थ लक्ष्मीदहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी दहिवडी येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये जवळ जवळ 170 रुग्णाची मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. या मध्ये डॉक्टरांनी सुचविलेल्या सिटी स्कॅन च्या तपासणीवर सांगोला स्कॅन सेंटर व शार्दुल डायग्नोस्टिक सेंटर पंढरपूर येथे 50 % सवलतीच्या स्कॅन केले जाणार आहेत. व शिबिरातील पेशंटसाठी हॉस्पिटल मधील पॅथोलाॅजी मध्ये रक्त लघावी तपासणी मध्ये 20%सवलत आणि हॉस्पिटल मधील बिलामध्ये सवलत या सुविधा पेशंट साठी दिल्या जाणार आहेत. स्पंदन हॉस्पिटल मध्ये दररोज 24 *7 फिजिशियन डॉ अतुल बोरोटे उपलब्ध आहेत. स्पंदन हॉस्पिटल कोणत्याही इमर्जन्सीसाठी सदैव तयार असेल. स्पंदन हॉस्पिटलमध्ये मेडिसिन, अस्थिरोग, सर्जरी,स्त्री रोग निदान व उपचार ,बालरोग न्यूरोसर्जरी, त्वचारोग,मूत्र रोग,ट्रॉमा केअर सेंटर व प्रत्येक डॉक्टरांची ठराविक वेळी ओपीडी व सर्व सुपर स्पेशलिटी डॉक्टरांची व्हिजिट प्रत्येक आठवड्याला असते याचा सर्व गरजू पेशंटनि लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.या वेळी लक्ष्मी दहिवडी ग्रामस्थ विशेषतः गावाचे पोलिस पाटील मधुकर पाटील व ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,सर्व प्रतिष्ठित गावकरी यांचे सहकार्य लाभले.या शिबिरासाठी डॉ पियूष साळुंखे पाटील,डॉ सचिन गवळी, डॉ अतुल बोरोडे, डॉ संदीप देवकाते, डॉ नेहा पाटील, डॉ मेघना देवकाते, डॉ अजिंक्य नष्टे, डॉ योगेश बाबर, डॉ राहुल इंगोले, डॉ गणेश गुरव व स्पंदन हॉस्पिटल डॉक्टर टीम व सहकारी उपस्थित होते.