वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार काढला..! डॉ अरविंद गिराम " /> वादग्रस्त वैद्यकीय अधिक्षकांचा पदभार काढला; डॉ.अरविंद गिराम अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक
IMG-LOGO
Home आरोग्य वादग्रस्त वैद्यकीय अधिक्षकांचा पदभार काढला; डॉ.अरविंद गिराम अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक
आरोग्य

वादग्रस्त वैद्यकीय अधिक्षकांचा पदभार काढला; डॉ.अरविंद गिराम अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक

November 2022 163 Views 0 Comment
IMG

वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार काढला..! डॉ अरविंद गिराम अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक 

सांगोला (तालुका प्रतिनिधी) जखमी वारकऱ्यांवर  उपचार करताना दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे सर्वत्र टीकेचे धनी झालेले वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम फुले यांचा सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार अखेर काढला आहे. त्यांच्या जागी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे  वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांच्याकडे सांगोल्याचा अतिरिक्त पदभार दिला आहे.

      वारकरी संप्रदायाला हादरवणारी दुर्घटना ३१ आली ऑक्टोबर रोजी जुनोनी ता. सांगोला येथे घडली होती. या दुर्घटनेत तब्बल ७ वारकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते तर ५ वारकरी जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.फुले तब्बल तासभर उशीराने रुग्णालयात दाखल झाले होते. यामुळे त्यांना रुग्णालयातच सामाजिक कार्यकर्ते तसेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. शिवाय एक तास उशिरा रुग्णालयात येऊनही त्यांनी रुग्णांवर कोणतेही उपचार न करता सर्व जखमींना रेफर करण्यास सांगितले. गेल्या काही महिन्यापूर्वी सांगोला येथे झालेल्या आमसभेतही सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फुले यांच्या कामाविषयी शहर आणि तालुक्यातील तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

 

डॉ.उत्तम फुले यांच्याकडून सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार काढून घेतला आहे.  त्यांच्या जागी सध्या मंगळवेढा येथे वैद्यकीय अधीक्षक (वर्ग १) म्हणून कार्यरत असणारे डॉ. अरविंद गिराम यांच्याकडे सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.