कृषी विभाग कडून जी. आय प्राप्त कृषी उत्पादनाचे प्रचार आणि प्रस" /> कृषी विभाग कडून जी आय प्राप्त कृषी उत्पादने प्रचार आणि प्रसिद्धी नोंदणी अभियान
IMG-LOGO
Home सामाजिक कृषी विभाग कडून जी आय प्राप्त कृषी उत्पादने प्रचार आणि प्रसिद्धी नोंदणी अभियान
सामाजिक

कृषी विभाग कडून जी आय प्राप्त कृषी उत्पादने प्रचार आणि प्रसिद्धी नोंदणी अभियान

July 2022 257 Views 0 Comment
IMG

कृषी विभाग कडून जी. आय प्राप्त कृषी उत्पादनाचे प्रचार आणि प्रसिद्धी नोंदणी अभियान

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कृषि विभाग व अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ यांचे संयुक्त विद्यमाने व पणन मंडळ पुणे यांचे सहकार्याने महुद ता. सांगोला येथे सोलापूर डाळिंब या भौगोलिक मानांकन (जी. आय.) प्राप्त कृषि उत्पादनांचे प्रसार व प्रचारप्रसिध्दी प्रशिक्षण व अधिकृत वापरकर्ता नोंदणी अभियान कार्यक्रम घेण्यात आला. 

      यावेळी उपविभागिय कृषि अधिकारी सर्जेराव तळेकर, कृषि अधिकारी कृषि आयुक्तालय सुनील गिरम, एम.आय.डी.एच. चे राज्य सल्लागार गोविंद हांडे, पणन मंडळाचे आदित्य माने, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव काटे, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष शहाजीराव जाचक, भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अतुल शिंगाडे, नारायण काटकर, महेंद्र बाजारे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. भौगोलिक मानांकन वापरकर्ता नोंदणी कार्यपद्धती, आनारनेट नोंदणी, डाळिंब निर्यातीमधील संधी, पणन मंडळाच्या योजना, डाळिंब क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम, पिन होल बोरर समस्या, नविन डाळिंब लागवड याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भौगोलिक मानांकन वापरकर्ते यांना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबर नविन भौगोलिक मानांकन वापरकर्ता नोंदणी करणेसाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. सुत्रसंचालन मंडळ कषि अधिकारी अमोल अभंग यांनी केले. यावेळी सरपंच संजीवनी लुबाळ, उपसरपंच बाबा येळे, कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, मारूती बोराटे व डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.