डॉ. अतुल बोरोडे डीएनबी मेडिसिन हे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्" /> डॉ. अतुल बोरोडे डीएनबी मेडिसिन हे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास उपलब्ध
IMG-LOGO
Home आरोग्य डॉ. अतुल बोरोडे डीएनबी मेडिसिन हे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास उपलब्ध
आरोग्य

डॉ. अतुल बोरोडे डीएनबी मेडिसिन हे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास उपलब्ध

July 2022 199 Views 0 Comment
IMG

डॉ. अतुल बोरोडे डीएनबी मेडिसिन हे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास उपलब्ध

सांगोला प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील अल्पवधीत लोकांचे विश्वासाला पात्र ठरलेले स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता 24 तास अत्यावश्यक रुग्णांना उपचार केले जाणार आहे.त्यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब,विषबाधा,सर्पदंश, किडनीचे आजार, फिट, मिरगी, अपघात, मेंदूत रक्तस्त्राव,अर्धांग वायू,दमा, कॅन्सर, कावीळ, इत्यादी रोगांवर आता उपचार होणार आहेत. त्याचबरोबर स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागाचे डॉ.शैलेश डोंबे व डॉ. अजिंक्य नष्टे हेही सेवा देणार आहेत. स्पंदन हॉस्पिटल मध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. कुलदीप कोल्पकवार, मेंदू मनका तज्ञ डॉ. प्रवीण वायकुळे ,डॉ. देवदत्त पाटील, किडनी व मूत्र रोग तज्ञ डॉ. सचिन बोटे, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रियंका दोडके, बालरोगतज्ञ डॉ. संगीता पिसे ,सर्जन डॉक्टर सौरभ अजळकर व डॉ.सप्तेश जाधव, अस्थिरोग तज्ञ डॉ. पियुष साळुंखे पाटील,डॉ. सचिन गवळी त्याचबरोबर स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. नेहा साळुंखे पाटील, डॉ.मेघना देवकते डॉ. अवधूत काशीद हेही स्पंदन हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत.

       एक जुलै डॉक्टर डे चे औचित्य साधून सांगोल तालुक्यातील जनतेसाठी एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा मानस संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पियुष साळुंखे पाटील यांनी बोलून दाखविला. यावेळी त्यांनी सांगितले सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी अल्प दरामध्ये उच्च दर्जाच्या सुविधा एका छताखाली देण्याचा प्रयत्न आमच्या टीम कडून होत आहेत. यावेळी डॉ. अतुल बोरोडे यांना शुभेच्छा दिल्या.

 सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन व स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांनी हॉस्पिटल संदर्भात माहिती दिली व सांगोला तालुक्यातील कोणताही पेशंट उपचार मिळाले नाहीत किंवा तालुक्यात उपचार होत नाहीत म्हणून दुसऱ्या तालुक्यात किंवा मोठ्या शहरात जाणार नाही याची काळजी घेतली जाईल व सर्वसामान्य लोकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना नवीन फिजिशियन डॉ. अतुल बोरोडे म्हणाले की स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल इथून पुढच्या काळामध्ये रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देईल. दर्जेदार हॉस्पिटल व सर्व सोयींनी युक्त असा नावलौकिक लवकरच प्राप्त करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांचे एमबीबीएस चे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे व डीएनबी जनरल मेडिसिन ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. कोणताही कसलाही कितीही क्रिटिकल पेशंट असू देत त्याच्यावर आता स्पंदन मध्ये उपचार होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉक्टर डे चे औचित्य साधून स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कडून सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी डॉ. पियुष साळुंखे पाटील डॉ. सचिन गवळी डॉ. शैलेश डोंबे डॉ. अजिंक्य नष्टे डॉ. प्रभाकर माळी डॉ.सौरभ आजळकर डॉ. संदीप देवकते डॉ. किरण जगताप डॉ.प्रफुल्ल बाबर डॉ. राहुल इंगोले डॉ.सैफून तांबोळी डॉ. राजेंद्र कुंभार डॉ. रामचंद्र जांगळे ,डॉ.वैभव जांगळे यांच्यासह हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ उपस्थित होता.