डॉ शीतल अजळकर यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद ये" /> डॉ शीतल अजळकर यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे निवड
IMG-LOGO
Home आरोग्य धनसंपदा डॉ शीतल अजळकर यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे निवड
आरोग्य धनसंपदा

डॉ शीतल अजळकर यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे निवड

April 2022 430 Views 0 Comment
IMG

डॉ शीतल अजळकर यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे निवड

 

सांगोला प्रतिनिधी

सांगोला तालक्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल सौरभ अजळकर यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी भारतातील अग्रगण्य रेनबो हॉस्पिटल हैद्राबाद येथे DNB NEONATALOGY या कोर्स साठी निवड झाली आहे.त्यांचे वैद्यकीय शिक्षण M.B.B.S हे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट सेवाग्राम वर्धा येथून पूर्ण झाले आहे.M.D हे सुध्दा सेवाग्राम येथूनच पूर्ण झाले आहे.त्या सांगोला येथील प्रसिद्ध सर्जन डॉ सौरभ अजळकर यांच्या पत्नी आहेत आणि प्रसिद्ध डॉक्टर कै.शंकर अजळकर यांच्या स्नुषा आहेत.डॉ शीतल यांची निवड ही सांगोला तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे.सांगोला सारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी मिळवलेले यश हे खरोखर कौतुकास्पद आहे. सांगोला तालुक्यातील त्या एकमेव बालरोग तज्ञ आहेत की ज्यांची DNB NEONATALOGY या कोर्स साठी निवड झाली.