एकाच रात्रीत महसूल प्रशासनाची वाळू माफियांवर मोठी कारवाई एकाच रात्रीत महसूल प्रशासनाची वाळू माफियांवर मोठी कारवाई; तीन टेम्पो सहित 19 लाख 6 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त : अभिजीत पाटील
IMG-LOGO
Home क्राईम एकाच रात्रीत महसूल प्रशासनाची वाळू माफियांवर मोठी कारवाई; तीन टेम्पो सहित 19 लाख 6 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त : अभिजीत पाटील
क्राईम

एकाच रात्रीत महसूल प्रशासनाची वाळू माफियांवर मोठी कारवाई; तीन टेम्पो सहित 19 लाख 6 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त : अभिजीत पाटील

September 2021 66 Views 0 Comment
IMG

एकाच रात्रीत महसूल प्रशासनाची वाळू माफियांवर मोठी कारवाई

 

तीन टेम्पो सहित 19 लाख 6 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त : अभिजीत पाटील

 

सांगोला/प्रतिनिधी :

सांगोला तालुक्यांमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धाड टाकून वाहने व मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही भरारी पथकामार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे.

तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने 1 सप्टेंबर रोजी सोनंद येथील सांगोला सोनंद रोडवर अवैध वाळू उपसा करणाऱ्या सुरेश काशिद सोनंद यांचा बिना नंबरचा 407 टेम्पो किंमत 5 लाख रुपये व 1 ब्रास वाळू 35 हजार 550 रुपये व वाहनावरील शासकीय रक्कम रुपये 1 लाख तसेच आगलावेवाडी येथील रामा आगलावे यांचा बिना नंबरचा 407 टाटा कंपनीचा टेम्पो त्या वाहनांची किंमत अंदाजे 5 लाख व 1 ब्रास वाळूची किंमत 35 हजार 550 रुपये वाहनावरील शासकीय रक्कम रुपये 1 लाख सदरची दोन्ही वाहने सांगोला सोनंद रोडवर पाठलाग करून पकडण्यात आली आहेत. तसेच खारवटवाडी सांगोला येथील बापू लेंडवे यांचा लेलँड एम.एच. 09 क्यु 5245 यांच्या मालाची किंमत अंदाजे 5 लाख व 1 ब्रास वाळू ची किंमत 35 हजार 550 रुपये व वाहनावरील शासकीय रक्कम रुपये 1 लाख रुपये जुना मेडशिंगी रोड बेले बंधाऱ्याजवळ पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे. या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची नोटीस काढण्यात आलेली आहे. तीन वाहनांचे दंडात्मक रक्कम 1 लाख 6 हजार 650 रुपये व वाहनावरील 15 लाख रुपये असा एकूण संपूर्ण मुद्देमालासह रक्कम 19 लाख 6 हजार 650 रुपये जप्त करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र शासन यांच्याकडील परिपत्रक 2011 अन्वये ग्रामस्तरीय समिती गठीत केलेली आहे. सदर समितीमध्ये सरपंच अध्यक्ष असून इतर प्रशासकीय कर्मचारी हे सदस्य असुन ग्रामस्तरीय समितीने गावांमध्ये होणारा अवैध वाळू उपसा वाहतुकीवर नियंत्रण ठेवायचे आहे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी या प्रकरणी नियंत्रण ठेवायचे आहे. तरी जे कोणी अवैध वाळू उपसा वाहतूक करतील त्यांच्या विरुद्ध तहसील कार्यालय सांगोला यांच्यामार्फत कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे.