सांगोला प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषद निवडणुकीची धग आता उत्कर्षबिंदूवर असून प्रभाग क्रमांक 4 येथे नगरसेवक पदासाठीची स्पर्धा अधिकच रंगात आली आहे. या प्रभागातून युवकांचा विश्वासार्ह आणि जिद्दी नेतृत्व म्हणून ओळख असणारे डॉ महेश राऊत हे यंदाच्या निवडणुकीत फुगा या चिन्हावर उमेदवारी रिंगणात उतरले आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार असल्याने प्रचाराला विशेष गती मिळाली आहे.
प्रभागातील नागरिकांच्या मनात ठसा उमटवणारे डॉ महेश राऊत यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट विचारसरणी, साधेपणा आणि जनसंपर्क यावर आधारलेले आहे. प्रभागाच्या विकासासाठी फुगा चिन्हावर मतदान करून नवा बदल घडवण्याची विनंती ते नागरिकांसमोर करत आहेत. त्यांच्या प्रचारातील घोषवाक्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तय्यार हे मतदारांमध्ये उत्साह निर्माण करत आहे.
गेल्या काही वर्षांत प्रभागात अनेक समस्या उभ्या राहिल्या—रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा अनियमित, गटार व्यवस्थेची उणीव, अस्वच्छता, सार्वजनिक सोयींची कमतरता अशा प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत. या साऱ्या प्रश्नांची सखोल जाण आणि त्यावरील उपयुक्त उपाययोजना डॉ महेश राऊत यांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडली आहे.
युवकांसाठी क्रीडा साहित्य आणि रोजगार मार्गदर्शन, महिलांसाठी स्व-सहाय्यता उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा, सुरक्षित व सुबक रस्ते, आधुनिक प्रकाशयोजना, स्वच्छता मोहीम अशा अनेक योजनांचा आराखडा त्यांनी मतदारांपुढे ठेवला आहे.भेटीगाठींमधून ते प्रत्येक नागरिकाची समस्या ऐकून घेत असून ‘आपलाच नगरसेवक’ म्हणून आपली प्रतिमा दृढ करत आहेत.
प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक, युवा संघटना, महिला बचतगट यांनीही त्यांच्या कामाची दखल घेत समर्थन दर्शवले आहे. “स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक प्रभागाची निर्मिती” हे त्यांचे ध्येय असल्याचे ते प्रत्येक प्रचारार्थ रॅली मध्ये स्पष्ट करत आहेत.प्रभाग 4 मधील चाणाक्ष मतदार कोणत्याही प्रलोभने अणि खोट्या आश्वासन यांना बळी पाडणार नाहीत असा विश्वास डॉ महेश राऊत यांनी दाखवला ,आता मतदारांच्या विवेक बुद्धी वर अवलंबून आहे. नगरसेवक म्हणून कोणाच्या हाती नेतृत्वाची धुरा जाते हे 3 डिसेंबरलाच कळणार आहे.