जुजारपूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शेकापचे पवन गाडे यांची " /> जुजारपूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शेकापचे पवन गाडे यांची बिनविरोध निवड...
IMG-LOGO
Home राजकारण जुजारपूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शेकापचे पवन गाडे यांची बिनविरोध निवड...
राजकारण

जुजारपूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शेकापचे पवन गाडे यांची बिनविरोध निवड...

June 2025 353 Views 0 Comment
IMG

जुजारपूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शेकापचे पवन गाडे यांची बिनविरोध निवड...

शेकापक्षाने सरपंच पदाची ओपनची जागा असताना मागासवर्गीय समाजाला सरपंच पदाची संधी दिली...

 

कोळा/वार्ताहर

सांगोला तालुक्यातील जुजारपूर ग्रामपंचायतवर शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते आमदार बाबासाहेब देशमुख यांचे अत्यंत विश्वासू पवन सोपान गाडे यांची नूतन सरपंच पदी बिनविरोध निवड झाली निवडणूक तथा पीठासन मंडलाधिकारी श्रीमती व्ही .व्ही बरबडे पाटील यांनी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने पवन गाडे यांची बिनविरोध निवड विजयी घोषित केले.नूतन सरपंच यांचा आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नूतन सरपंच व उपसरपंचांना सर्व सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यांना शुभेच्छा दिल्या.

जुजारपूर ता सांगोला येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या सरपंच उपसरपंच निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती व्ही .व्ही बरबडे पाटील सहाय्यक तलाठी प्रमोद आलदर ग्रामसेविका शुभांगी सोडळ यांनी काम पाहिले सरपंचपदी पवन गाडे विराजमान झाल्यानंतर जुजारपूर ग्रामस्थांच्या वतीने शेकापचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, भोला पाटील पत्रकार जगदीश कुलकर्णी, ईश्वर पाटील, गजेंद्र हिप्परकर, राजेंद्र पाटील, बिरुदेव चौगुले, पिंटू माने, रुपेश हाके काका पाटील, पुतळाबाई हिप्परकर, बायना खडके, इंद्राबाई माने, आप्पासो पवार,यांच्यासह आदी मान्यवरांनी शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सर्व ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले शेतकरी कामगार पक्षाने सर्वसामान्य वर्गाला न्याय देण्यासाठी मागासवर्गीय समाजाला पवन गाडे यांच्या रूपाने सरपंच पदाची संधी दिली आहे सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे सध्याच्या परिस्थितीत मध्ये गावाने गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन पुढच्या पिढीला सरपंच पद निवडणूक बिनविरोध करून चांगला विचार दिलेला आहे सर्व वर्गातील सर्वसमावेशक तरुण एकत्र येऊन गोरगरीब जनतेला विद्यार्थ्यांना बहुजन समाजातील घटकांना सहकार्य करतात त्यांचे चांगले कार्य आहे सर्वांचे अभिनंदन करतो असे सांगितले. सरपंच पवन गाडे म्हणाले 

शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सरपंच पदाची ओपन ची जागा असताना मागासवर्गीय समाजाला संधी दिली याबद्दल गावाचे आभार मानतो शेतकरी कामगार पक्षांमध्ये माझी तिसरी पिढी काम करत आहे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवन गाडे यांनी सांगितले. सरपंच निवडणूक निवडीनंतर गावातून फटाक्याच्या आतषबाजीत गुलाबाचे मुक्त उधळून करत वाजत गाजत ढोल ताशाच्या निदानात हलगी च्या आवाजात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जुजारपूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी सरपंच निवड होण्याअगोदर गुजरात येथे झालेल्या विमान अपघातात अनेक जणांचे प्राण गेले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रस्ताव मंडलाधिकारी श्रीमती व्ही .व्ही बरबडे पाटील यांनी अनुमोदन दिले श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब पाटील आभार पत्रकार जगदीश कुलकर्णी यांनी मानले.