वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे क" /> वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी डॉ. पियूष साळुंखे पाटील यांची मागणी
IMG-LOGO
Home राजकारण वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी डॉ. पियूष साळुंखे पाटील यांची मागणी
राजकारण

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी डॉ. पियूष साळुंखे पाटील यांची मागणी

May 2025 194 Views 0 Comment
IMG

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी डॉ. पियूष साळुंखे पाटील यांची मागणी 

सांगोला प्रतिनिधी 

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसल्याने सांगोला तालुक्यातील प्रामुख्याने फळ बागांचे तसेच नागरिकांच्या घरांचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनावरे मरण पावले आहेत. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. अनेकांचे शेड वाऱ्याने उडून गेले आहेत. तर शेती पिकाचेही मोठे नुकसान झाले असून, हातात तोंडाला आलेली फळ बागा डोळ्यासमोर उध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पोहचून तातडीने पंचनामे करावेत आणि त्या संदर्भात चा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावा आणि बळीराजाला व नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी डॉ. पियूष साळुंखे पाटील यांनी केली आहे. 

मागील 7 ते 8 दिवसांपूर्वी सांगोला शहर आणि तालुक्यातील काही भागाला वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामध्ये तालुक्यातील आंबा, द्राक्ष, डाळिंब बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या सांगोला तालुक्यातील बागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे त्या मागणीनुसार प्रशासनाने गांभीर्याने घेऊन अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.

 पावसाच्या लहरीपणामुळे शेती उद्योग अडचणीत सापडला पाणीटंचाईचा सामना करत असताना येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने कमी पाण्यावर चांगल्या प्रकारे शेती पिकवली यामुळे तालुक्यात पिकलेले द्राक्ष, डाळिंब हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. मात्र पाणीटंचाई बरोबर आसमानी संकटाचा सामना करताना शेतकरी पुरता दमला आहे. अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे आमची प्रामाणिक भूमिका असणार आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी असून, यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे  डॉ. पियूष साळुंखे पाटील यांनी सांगितले.