जवळा ग्रामपंचायतीवर माजी आम.दिपकआबांची सत्तेचीपरंपरा कायम<" /> जवळा ग्रामपंचायतीवर दीपक अबांचे निर्विवाद वर्चस्व..
IMG-LOGO
Home राजकारण जवळा ग्रामपंचायतीवर दीपक अबांचे निर्विवाद वर्चस्व..
राजकारण

जवळा ग्रामपंचायतीवर दीपक अबांचे निर्विवाद वर्चस्व..

January 2021 441 Views 0 Comment
IMG

जवळा ग्रामपंचायतीवर माजी आम.दिपकआबांची सत्तेचीपरंपरा कायम

 

 ११ जागेवर दणदणीत विजय मिळवत दिपकआबांची जवळा निर्विवाद सत्ता..

 

सांगोला प्रतिनिधी

 संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जवळा ग्रामपंचायत निवडणूकीत माजी आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम ठेवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष माजी आम.दिपकआबा साळुंखे-पाटील व भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्यामध्ये जवळा ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली.यामध्ये माजी आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या पॅनल ला ११जागा तर भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या पॅनल ला ४ जागा मिळविता आल्या आहेत.

गेली ३५ वर्षे जवळा ग्रामपंचायतीवरती दिपकआबा यांची एक हाती सत्ता आहे.सत्तेची परंपरा अखंडित ठेवत जवळेकरांचा दिपकआबांवरील प्रेम,विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

 

       एकुण पंधरा सदस्य संख्या असलेल्या जवळा ग्रामपंचायत निवडणूकीत माजी आम.दिपकआबा सांळुखे पाटील यांच्या गटातील वार्ड क्र.२मधून विजयकुमार भानुदास तारळकर,शालन गुलाबराव साळुंखे,विठ्ठल उर्फ बिनू वसंत गयाळी, वार्ड क्र.३मधून निसार नालसाब शेख ,सविता दत्तात्रय बर्वे,रुक्मिणी अरुण साळुंखे, वार्ड क्र.४मधून सज्जन श्रीधर मागाडे,लिलावती बबन म्हेत्रे,वार्ड क्र.५मधून सुषमा संभाजी घुले,मीना अनिलकुमार सुतार,नवाज आदम खलीफा असे एकुण अकरा उमेदवार विजयी झाले आहेत.

 

 भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या गटातून वार्ड क्र.१मधून नानासाहेब बाळू कोळेकर,शशिकांत आप्पासाहेब देशमुख,गोकुळा ज्ञानू गावडे, तर वार्ड क्र.४मधून सुरेखा चंद्रकांत आलदर असे एकूण चार उमेदवार विजयी झाले आहेत.

 

 एकुणचं अत्यंत चुरशीची निवडणूक होणार असा मतदारांतून सुर होता परंतू एकतर्फिच झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.