दिपकआबा व शहाजीबापू यांच्या पाठपुरव्याला यश ; टेंभू योजनेच्या " /> दिपकआबा व शहाजीबापू यांच्या पाठपुरव्याला यश ; टेंभू योजनेच्या विस्तारासाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध
IMG-LOGO
Home राजकारण दिपकआबा व शहाजीबापू यांच्या पाठपुरव्याला यश ; टेंभू योजनेच्या विस्तारासाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध
राजकारण

दिपकआबा व शहाजीबापू यांच्या पाठपुरव्याला यश ; टेंभू योजनेच्या विस्तारासाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध

February 2024 124 Views 0 Comment
IMG

दिपकआबा व शहाजीबापू यांच्या पाठपुरव्याला यश ; टेंभू योजनेच्या विस्तारासाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध


सांगोला : तालुका प्रतिनिधी

राज्यातील महविकास आघाडी सरकारने तथा तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सादर केलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त ८ टी.एम.सी. पाणी वाटपाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. टेंभू योजनेच्या विस्ताराबाबत आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुरव्याला यश आले आहे. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच टेंभू, म्हैसाळ योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आजी माजी आमदारांचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश आले आहे. विस्तारित टेंभू योजनेच्या कामाची ७५३ कोटी ७९ लाख रुपयांची निविदा शासनाने काढली आहे.

विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना आणि म्हैसाळ योजनेस मंजुरी मिळावी यासाठी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाने विस्तारित टेंभू योजनेच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील गावे ओलिताखाली येणार आहेत. विस्तारित योजनेसाठीही पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सुमारे ७५३ कोटी ७९ लाख रुपयांच्या कामाची ई-निविदा काढल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी या ऐतिहासिक निर्णयामुळे सुखावला आहे.
टेंभू योजनेच्या विस्तारित कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून यातून बेवनूर थेट गुरुत्व नलिका व त्यावरील वितरिका, लघुवितरिकांचे काम बंदिस्त पाईपलाईन पद्धतीने करणे, पुढील पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्ती व परीचलन करण्यात येणार आहे. तसेच सातत्याने पाठपुरावा केल्याने म्हैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये नवीन ८ वंचित गावांचा समावेश केल्याने आता म्हैशाळ योजनेमध्ये घेरडी, सोनंद, पारे, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, जवळा व आगलावेवाडी या गावांसह पारे, हंगिरगे, जवळा व नराळे येथील तलावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच टेंभू योजनेतील कामत गुरुत्व नलिकेतून ५ हजार ४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तर डोंगरगाव, हणमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापाचीवाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राला या एक टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार आहे.

आजी माजी आमदारांच्या प्रयत्नाला यश ; सांगोल्यात पुन्हा आनंदोत्सव

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजने अंतर्गत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून उजनी धरणातून सांगोला तालुक्यासाठी नुकतेच दोन टीएमसी पाणी मंजूर केले होते. या ऐतिहासिक निर्णयानंतर संपूर्ण सांगोला शहर व तालुक्यात शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यानंतर लगेचच आजी-माजी आमदारांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेच्या विस्तारातून सांगोला तालुक्याला आणखी एक टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने सांगोला शहर व तालुक्यात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.