देवेंद्र फडवणीस यांनी जात बघून भेट नाकारली - गणेश अंकुशराव" /> देवेंद्र फडवणीस यांनी जात बघून भेट नाकारली - गणेश अंकुशराव
IMG-LOGO
Home राजकारण देवेंद्र फडवणीस यांनी जात बघून भेट नाकारली - गणेश अंकुशराव
राजकारण

देवेंद्र फडवणीस यांनी जात बघून भेट नाकारली - गणेश अंकुशराव

November 2023 44 Views 0 Comment
IMG

देवेंद्र फडवणीस यांनी जात बघून भेट नाकारली - गणेश अंकुशराव


अन्यायग्रस्त 61 लाख आदिवासीच्या 33 जमातीमध्ये प्रचंड नाराजी.


पंढरपुर  प्रतिनिधी

कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होत असते. ही होणारी पूजा न होऊ देण्याचा इशारा पंढरपूर येथे मराठा क्रांती मोर्चा व सकल महादेव कोळी जमातीच्या वतीने देण्यात आला होता.
           परंतु काल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत महादेव कोळी समाजाच्या शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हास्तरावर असणारे प्रश्न डिसेंबरमध्ये आपण सर्व अधिनियम जनगणना आयोगाचे रिपोर्ट जिल्हा गॅझेटर्स यांचा अभ्यास करून सोडवू असे आश्वासन त्यांनी दिलेले होते. तसेच राज्यस्तरावरील प्रश्नसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महापूजेसाठी पंढरपूरला आल्यानंतर त्यांच्याशी भेट घालून देतो असे आम्हाला आश्वासन दिले होते. आम्ही भेट घेण्यासाठी पाच वाजले पासून शासकीय विश्रामगृहाच्या गेटवरती थांबलो होतो. मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व सदस्यांना देवेंद्र फडवणीस यांनी भेट देऊन त्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. परंतु आम्ही सगळे आदिवासी महादेव कोळी असल्याने व आमच्या समाजाचे आमदार खासदार मंत्री अथवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमची जात बघून देवेंद्र फडवणीस यांनी आमची भेट नाकारली असल्याचे आरोप वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला  आहे.
गेली 40 ,50 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या अन्यग्रस्त आदिवासी जमातीला न्याय न दिल्यामुळे चिडून 2014 ला  भारतीय जनता पार्टीला या अन्यायग्रस्त 61 लाख आदिवासी ने मतदान केले होते. म्हणून देवेंद्रजी सत्तेत आले होते हे त्यांनी लक्षात ठेवावे येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आता मी जसे 2014 ला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेपासून वंचित ठेवले तसेच भारतीय जनता पार्टीला आम्ही सत्तेपासून वंचित ठेवू असा इशारा दिला आहे यावेळी सकल कोळी समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.