अचकदाणी येथील उपोषणकर्ते विजय पाटील यांची तब्ये" /> अचकदाणी येथील उपोषणकर्ते विजय पाटील यांची तब्येत खालवल्यामुळे सोलापूर येथे उपचार सुरू..
IMG-LOGO
Home राजकारण अचकदाणी येथील उपोषणकर्ते विजय पाटील यांची तब्येत खालवल्यामुळे सोलापूर येथे उपचार सुरू..
राजकारण

अचकदाणी येथील उपोषणकर्ते विजय पाटील यांची तब्येत खालवल्यामुळे सोलापूर येथे उपचार सुरू..

October 2023 27 Views 0 Comment
IMG

अचकदाणी येथील उपोषणकर्ते विजय पाटील यांची तब्येत खालवल्यामुळे सोलापूर येथे उपचार सुरू..

 

सांगोला प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू असून सांगोला तालुक्यातील अचाकदानी येथे हनुमान मंदीरात उपोषणास बसलेला तरुण विजय ततोबा पाटील याची तब्येत बिघडल्यामुळे तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल येथे दाखल करण्यात आले.
अंतरवाली सराटी येथील जरंगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा व धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील अचकदानी येथे शेतकरी कुटुंबातील विजय पाटील यांनी 27 ऑक्टोबर 2023 पासून गावामध्ये उपोषण चालू केले काल रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना 108 ॲम्बुलन्स मधून सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले आहे. सध्या त्याच्यात त्यांच्यावर उपचार सुरू असून धनगर समाजाला एसटी प्रवर्ग व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचे दाखले मिळत नाहीत तोपर्यंत आपले उपोषण चालू राहणार असे विजय पाटील यांनी सांगितले
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपोषण चालूच आहे.
महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू असून काही ठिकाणी या आंदोलनाने उग्र स्वरूप निर्माण केलेले आहे ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय नेते मंडळी व शासन दरबारी दबाव वाढत आहे परंतु शासनाने अजून पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही तरी सर्व मराठा समाजाकडून राजकीय मंडळींना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे यावर लवकरात लवकर शासन निर्णय अपेक्षित आहे.


सांगोला तालुक्यातील आंदोलने

साखळी उपोषण
दिनांक 26/10/2023 पासून एखतपुर ता सांगोला येथे
श्री जितेंद्र देशमुख,श्री ज्ञानेश्वर इंगोले(सकल मराठा समाज कार्यकर्ते मौजे एखतपुर)
धायटी ता सांगोला येथे
श्री धनराज भोसले-पाटील रा धायटी,सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष,राजे प्रतिष्ठान
कडलास तालुका सांगोला येथे श्री दिगंबर भजनावळे सरपंच कडलास ग्रामपंचायत
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे श्री अरविंद केदार, सकल मराठा समाज समन्वयक
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, हलदहिवडी ता सांगोलायेथे श्री किरण बाळासाहेब लेंडवे, सकल मराठा समाज, हलदहिवडी

बेमुदत आमरण उपोषण
दिनांक 27/10/2023 रोजी 10:00 वा हनुमान मंदिर, अचकदानी,ता सांगोला येथे श्री विजय तातोबा पाटील रा अचकदानी ता सांगोला हे महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास ST आरक्षणाचे दाखले व मराठा समाजास OBC आरक्षणाचे दाखले मिळावे या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहेत


चौकट ²

राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी असलेली सांगोला तालुक्यातील एकूण गावे:-
1.मांजरी
2.मेथवडे
3.गायगव्हाण
4.खिलारवाडी
5.मेडशिंगी
6.एखतपुर
7.पाचेगाव
8.हंगिरगे
9.देवकातेवाडी
10. इटकी
11. बामणी
12. डोंगरगाव
13. वाटंबरे
14. मानेगाव

चौकट 3
  धनगर समाजातील विजय पाटील यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत अमरण उपोषण केले आहे. धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळणार आहेत परंतु विजय पाटलांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी.

अरविंद केदार
सकल मराठा समाज समन्वयक सांगोला तालुका