टंचाई बैठकीत बळीराजाच्या हाती धुपाटणे...!!

भीष" /> टंचाई बैठकीत बळीराजाच्या हाती धुपाटणे...!!
IMG-LOGO
Home राजकारण टंचाई बैठकीत बळीराजाच्या हाती धुपाटणे...!!
राजकारण

टंचाई बैठकीत बळीराजाच्या हाती धुपाटणे...!!

September 2023 182 Views 0 Comment
IMG

टंचाई बैठकीत बळीराजाच्या हाती धुपाटणे...!!

भीषण चारा टंचाईत जनावरांच्या चारा टंचाई बाबत अवाक्षरही नाही ; खासदार आमदार यांच्याकडून भ्रमनिरास

सांगोला : प्रतिनीधी

सांगोला तालुक्यात असलेल्या भीषण पाणी आणि चारा टंचाईवर मार्ग काढण्यासाठी टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. या टंचाई आढावा बैठकीत सांगोला तालुक्यातील जनावरांच्या चारा टंचाई बाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक अवाक्षरही काढले नसल्याने सांगोला तालुक्यातील हजारो पशुपालक शेतकऱ्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.

पावसाळा जवळपास संपत आला तरीही सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस सांगोला तालुक्यात झाला आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने टँकरच्या पाण्यावर लोकांना तहान भागवावी लागत आहे तर सांगोला शहरातही तीन ते चार दिवस आड एकदा पाणीपुरवठा होत असल्याने तालुक्यातील नागरिकांना दुष्काळाची चाहूल लागली आहे अशा परिस्थितीत लोकांची तहान भागणे मुश्किल झाले असताना जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या सांगोला तालुक्यात अवघे काही दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असताना जनावरांच्या पाणी व चाऱ्याच्या प्रश्नावर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील आढावा बैठकीत ठोस भूमिका घेऊन पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी आशा तालुक्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने टंचाई आढावा बैठकीतून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाती फक्त धुपाटणे आले असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सध्या तालुक्यात असलेली टंचाई पाहता यंदाही चारा छावण्या सुरू कराव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, २०१९ रोजीच्या चारा छावण्याचे तब्बल २२ कोटींचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने चालू वर्षी चारा छावण्या सुरु करण्यासाठी कुणीही धाजवत नाही. चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलाबाबत टंचाई आढावा बैठकीत कोणतीही चर्चा न झाल्याने या टंचाई बैठकीचे फलित काय झाले अशीही चर्चा रंगू लागली आहे.

 

या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित होते

१) शेती सोबत पशुपालन हा सांगोला तालुक्यातील प्रमुख व्यवसाय असल्याने पशुधन जतन करण्यासाठी जनावरांच्या चारा प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित होते.
२) सदोष पर्जन्यमापक यंत्रामुळे अनेक मंडलात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्य मानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. याबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते
३) सध्या सांगोला नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि सांगोला तहसीलचे तहसीलदार ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय काम खोळंबले आहे याबाबत तात्काळ कार्यवाही होणे नागरिकांना अपेक्षित होते.
४) नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला ३५० क्युसेकने पाणी मंजूर असूनही प्रत्यक्षात २५० पेक्षा कमी वेगाने पाणी पुरवठा होत आहे. उर्वरित पाणी नेमके मुरते कुठे याबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते.