आबासाहेबांचे उर्वरित अपूर्ण राहिलेले स्वप्न सत्यात उतरव" /> आबासाहेबांचे उर्वरित अपूर्ण राहिलेले स्वप्न सत्यात उतरविणार-डॉ.बाबासाहेब देशमुख
IMG-LOGO
Home राजकारण आबासाहेबांचे उर्वरित अपूर्ण राहिलेले स्वप्न सत्यात उतरविणार-डॉ.बाबासाहेब देशमुख
राजकारण

आबासाहेबांचे उर्वरित अपूर्ण राहिलेले स्वप्न सत्यात उतरविणार-डॉ.बाबासाहेब देशमुख

June 2023 132 Views 0 Comment
IMG

आबासाहेबांचे उर्वरित अपूर्ण राहिलेले स्वप्न सत्यात उतरविणार-डॉ.बाबासाहेब देशमुख

 

दुष्काळी पाणी परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करणार

 
कोळा /वार्ताहर 
 पिढ्यान पिढ्या दुष्काळाची सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून  संघर्ष पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी देशभक्तांने तसेच त्यांच्या जोडीला व स्व.गणपतराव देशमुख यांनी  ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी परिषद घेतली. त्यानिमित्ताने आजपर्यंत 30 पाणी परिषदा झालेल्या आहेत. सांगोला व आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील तेरा दुष्काळी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून जनतेची एक मोठी चळवळ उभा केली. नागनाथ अण्णा नायकवडी व स्व. गणपतराव देशमुख पाणी परिषदेच्या माध्यमातून जनतेची मोठी चळवळ उभा केली या चळवळीच्या माध्यमातून कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करायला भाग पडले.गेल्या आठ वर्षांपूर्वी २४ वी पाणी परिषद ही यशस्वी पाणी परिषद म्हणून त्या पाणी परिषदेची गणना केली गेली. स्वर्गीय आबासाहेबांनी नेहमीच म्हटले आहे की "दुष्काळात जन्माला आलो तरी दुष्काळात मरणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करीन"सलग तीस वर्षे दुष्काळी जनतेने पाण्यासाठी दीर्घकाळ दिलेला व ऐतिहासिक स्वरूपाचा अभूतपूर्व असा लढा आहे. लोकशाही मार्गाने अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने चळवळीने सर्व टप्पे पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये अठरा वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या सह्याची निवेदने, गाव चावडी मोर्चा, तालुका कचोरील वरील मोर्चा, जिल्हा कचेरीवरील मोर्चे, पुणे येथील सिंचन भवनाला घेराव व ठिय्या आंदोलन दादर शिवाजी पार्क ते मंत्रालय मोर्चा व आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन व मानवी साखळी या सर्व मार्गाने जनतेमध्ये पाण्यासाठी जागृत करून राज्यकर्त्यांना टेंभू, ताकारी,म्हैसाळ व सांगोला शाखा प्रकल्पासह दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या सर्व योजनांच्या पूर्ततेसाठी आजपर्यंत पाणी परिषदेच्या माध्यमातून भाग पाडले. टेंभू, म्हैसाळ,ताकारी इत्यादी प्रकल्पाचे पाणी तलाव नदी आले आहे.चळवळीच्या पायाभूत घोषणेनुसार प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचणे आवश्यक आहे.त्यासाठी मुख्य कालव्यास कालव्याचा दर्जा देणे. पोट कालव्याची कामे पूर्ण करणे. तसेच कार्यक्षेत्रातील तलाव, पाझर तलाव, गाव तलाव व कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे भरून देणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून आपल्या हक्काचं उर्वरित राहिलेले क्षेत्र शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पोहोचले पाहिजे.याच्यासाठी पाणी परिषदा यशस्वी झालेल्याआजपर्यंत केंद्र व राज्य सरकारने नववर्षाच्या काळामध्ये सांगोला शाखा प्रकल्प, टेंभू, म्हैसाळ व ताकारी प्रकल्पासह राज्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी जवळजवळ २६ अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ते केवळ पाणी परिषदेतच यश म्हणावे लागले.महाराष्ट्रासह सबंध देशभर दुष्काळ,कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती यासारख्या संकटांना घाबरून इथला शेतकरी आत्महत्या करत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये ४९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणे हे राजकर्तेच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षातील शेती व पाणी विषयाच्या चुकीच्या धोरणामुळे उद्भवलेली समस्या आहेत. दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन व उच्चाटन करण्यासाठी आपण पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी व आमदार भाई डॉ.गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिलेला मार्ग आहे.त्या मार्गाने पुढे जाऊन उर्वरित समान पाणी वाटपाच्या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी भरीव निधीची तरतूद राज्यकर्त्यांना करायला भाग पाडण्यासाठी व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त व कर्जमाफी देऊन त्यांचे उतारे कोरे करण्यासाठी तसेच शेतीला हमीभाव व दुधाला आधारभूत खर्चावर आधारित दर मिळवण्यासाठी व शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी त्याचे मंगळवेढा येथे होत असलेली ३१वी पाणी परिषद आहे तरी सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील मायबाप जनता बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती.
१)टेंभू,म्हैसाळ,सांगोले शाखा, उरमेडी,निरा,देवधर इत्यादी योजनांना केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान कृषी सिंचन विकास योजनेत' समावेश करून ताबडतोब निधी उपलब्ध करावा.
२) टेंभू,म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमेडी,तारळी,ताकारी, धोम, बलकवडी, नीरा- देवधर इत्यादी योजनांचे पाणी समन्यायी वापराच्या तत्त्वावर आटपाडी, सांगोला,मंगळवेढा, जत, कवठेमंकाळ,तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्व,पलूस, खटाव, खंडाळा, माण इत्यादी दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळण्यासाठी 
३) वरील योजनांच्या मुख्य कालव्यासाठी व पोटकालव्यासाठी तसेच दिनांक 2 मे २०१७ रोजी शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणाप्रमाणे मुख्य कालव्यावर ठिकठिकाणी १०० हेक्टरच्या व त्यावरील सिंचनासाठी नवीन जलसाठे,लहान तलाव, पाजर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे, सध्या अस्तित्वात असलेले व नवीन साठे निर्माण करून नळाद्वारे त्यामध्ये पाणी साठवण्यासाठी निधीची व्यवस्था व तरतूद करणे.
४)महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने पाण्याचे दर छोट्या शेतकऱ्यांना परवडण्या एवढेच ठेवावेत आणि समान पाणी वाटपाची अंमलबजावणी करावी. 
५)चितळे जल आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीवर राबवून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे १००० घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याचे तत्व सर्व योजनांना लावून सरकारचे समन्यायी पाणीवाटप प्रत्याक्षात अंमल करून देशाच्या सरासरी सिंचन आहे टक्केवारी वाढवण्यासाठी
६)भीमा,माण,कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ताबडतोब भरून देण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी उजणी उजवा कालवा व जत,सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ ६ व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधीची व्यवस्था करण्यासाठी ३१ व्या पाणी परिषदेचे आयोजन केलेलं आहे.  देशभक्त क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी, व स्व. आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी घालून दिलेली  तत्त्वे,आदर्श, सामान्य जनतेप्रति असणारा दर, लोकशाही मूल्याची जोपासना, जन चळवळ, तसेच चळवळीच्या माध्यमातून, शेतकरी,कामगार,कष्टकरी, जनतेला सोबत घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यातील उर्वरित राहिलेले अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असे आव्हान डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.