बीडीओ साहेब मागे हटायचं नाय... मी आणि खासदार तुमच्या पाठीशी; आ" /> बीडीओ साहेब मागे हटायचं नाय... मी आणि खासदार तुमच्या पाठीशी; आ. समाधान आवताडे
IMG-LOGO
Home राजकारण बीडीओ साहेब मागे हटायचं नाय... मी आणि खासदार तुमच्या पाठीशी; आ. समाधान आवताडे
राजकारण

बीडीओ साहेब मागे हटायचं नाय... मी आणि खासदार तुमच्या पाठीशी; आ. समाधान आवताडे

June 2023 103 Views 0 Comment
IMG

बीडीओ साहेब मागे हटायचं नाय... मी आणि खासदार तुमच्या पाठीशी; आ. समाधान आवताडे

मंगळवेढा प्रतिनिधी           

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करून दहा-बारा दिवस झाले परंतु लिकेज काही कमी होईना, योजना ताब्यात घेण्यास मी विरोध केला कारण या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते.पण ही योजना सुरू होण्याच्या दृष्टीने बीडीओ साहेब मागे हटायचं नाही मी आणि खासदार तुमच्या पाठीशी आहे. या योजनेचे पाणी त्या गावाला मिळालेच पाहिजे अशी भूमिका आ. समाधान आवताडे यांनी मांडली
महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे होते यावेळी भाजप जिल्हा शशिकांत चव्हाण,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर,भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल,अशोक सुरवसे,उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर,
तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे,बालविकास अधिकारी जगन्नाथ गारूळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बाळू चोरमोले, परिवहन विभागाचे सिध्दनाथ पांढरे,पोलीस निरीक्षक रणजित माने, ग्रामीण पाणीपुरवठाचे राजकुमार पांडव,उजनी कालवा चे मनोज पंडीत,पशुधन अधिकारी सुहास सलगर,भूमिअभिलेखचे भगवान क्षीरसागर,क्रीडाधिकारी तानाजी मोरे,
बांधकाम विभागाचे शैलेंद्र गुंड,जि.प.बांधकामचे गौतम वाघमारे,पाणी पुरवठा विभागाचे मोहन पाटील,सुरेशभाकरे,बापूसाहेब मेटकरी,विवेक खिलारे,दिगंबर यादव,विजय बुरकूल आदीसह नागरिक मोठया उपस्थित होते,यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनेक योजनेचा लाभ थेट लाभार्थीपर्यंत नेण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला,यापूर्वी या योजनेचा लाभ मिळण्यास अडवणूक व अडचणी होत्या.शासकीय कार्यालयात होणाय्रा विलंबामुळे या योजनेचा लाभ घेण्याची मानसिकता होत नाही
मात्र या उपक्रमामुळे तात्काळ याचा निपटारा होणार आहे.महिलांना एस टी महामंडळाकडून महिला सन्मान योजना सुरू केली पण शाळा सुरू होणार असल्याने ग्रामीण भागात एस टी नेण्याची सुचना केली.लंपीने मृत जनावराची भरपाई देण्याची कार्यवाही करावी,खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य म्हणाले की,शासनाच्या अनेक योजना सगळ्याना माहित आहे असे वाटत नाही.
मात्र पाहिल्यांदा शिंदे -फडणवीस सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम घेवून योजना घेवून घरापर्यंत आले. या अगोदर असे उपक्रम राबविले नाहीत.प्रास्ताविकात तहसीलदार मदन जाधव यांनी नागरिकाची सर्व कामे एकाच छताखाली होण्यासाठी हा उपक्रम 20 स्टाॅलच्या माध्यमातून राबविला असून भविष्यात 8 महसूल मंडलमध्ये हा कार्यक्रम घेणार आहे इतर कामे महसूल खात्याची कामे लाभ देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.सूत्रसंचालन जयश्री कल्लाळे यांनी तर सायली जाधव यांनी मानले