चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा खंडागळे बिनविरोध  चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा खंडागळे बिनविरोध
IMG-LOGO
Home राजकारण चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा खंडागळे बिनविरोध
राजकारण

चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा खंडागळे बिनविरोध

December 2022 277 Views 0 Comment
IMG

चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा खंडागळे बिनविरोध 

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या आघाडीचे नाथा दत्तू खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भीमा बजबळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नाथा खंडागळे यांचा बिनविरोध सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला.

      चिणके ता. सांगोला हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी एकमेकांत संघर्ष करून आपली ताकद व वेळ वाया घालवू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन गावाच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने नाथा खंडागळे यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता उरली आहे. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नूतन बिनविरोध सरपंच नाथा खंडागळे यांचा सत्कार केला. आणि भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, विनायक मिसाळ, विलास मिसाळ, माणिक मिसाळ, मोहन मिसाळ, दैवत शितोळे, महादेव खंडागळे, पांडुरंग मिसाळ, सीताराम जानकर, अमोल काटे, हणमंत इंगळे, डॉ. महेश मिसाळ आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.