आबासाहेबांचा जनसेवेचा वसा व वारसा सक्षमप" /> आबासाहेबांचा जनसेवेचा वसा व वारसा सक्षमपणे पुढे चालवू - डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख
IMG-LOGO
Home राजकारण आबासाहेबांचा जनसेवेचा वसा व वारसा सक्षमपणे पुढे चालवू - डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख
राजकारण

आबासाहेबांचा जनसेवेचा वसा व वारसा सक्षमपणे पुढे चालवू - डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख

September 2022 198 Views 0 Comment
IMG

आबासाहेबांचा जनसेवेचा वसा व वारसा सक्षमपणे पुढे चालवू - डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख

 

शेकापच्या मजबूत संघटन बांधणीसाठी डॉ. अनिकेत देशमुख यांचा घेरडी गटात गावभेट दौरा संपन्न

 

सांगोला प्रतिनिधी:

सांगोला तालुक्यात शेकापचे संघटन मजबूत करण्यासाठी तसेच तालुक्यातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जनतेपर्यंत पर्यंत पोहोचून समजावून घेणे व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी आबासाहेबा नंतर खंडित झालेला गाव भेटीचा उपक्रम ज्येष्ठांच्या सल्ला व विचारविनिमय करून सुरु केला असून इथून पुढे आपण कायमस्वरूपी तो राबवणार आहे .आबासाहेबांनी तुम्हा सर्वांच्या आग्रहास्तव माझ्यावर सोपावलेली जबाबदारी आणि जनसेवेचा वसा व वारसा तेवढ्याच सक्षम व खंबीरपणाने पार पाडू असे प्रतिपादन घेरडी जि.प. गट गावभेट दौऱ्याप्रसंगी शेकाप युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांनी केले.

 

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शनिवार दि.१७ सप्टेंबर रोजी घेरडी जि. प. गटातील घेरडी,पारे, हंगिरगे, नराळे, डिकसळ, सोनंद, आगलावेवाडी , डोंगरगाव,गळवेवाडी आदी गावात डॉ.अनिकेत देशमुख यांचा गावभेट दौरा संपन्न झाला. या गावभेट दौर्‍याप्रसंगी घेरडी येथे डॉ.अनिकेत देशमुख बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख, प्रा.विठ्ठलराव शिंदे , चिटणीस दादासाहेब बाबर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, माजी सरपंच विठ्ठल मेटकरी, बयाजी लवटे ,हरिभाऊ पुकळे , विनायक कुलकर्णी,माजी जि.प.सदस्य किसन माने, मोसीन पाटील, सुनील भोरकडे ,सिदा मेटकरी आदी उपस्थित होते. तसेच घेरडी गटातील विविध गावात मान्यवरासह शेकापचे स्थानिक पदाधिकारी, आजी माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक गावातून स्व.गणपतराव देशमुखांचे वारसदर डॉ.अनिकेत देशमुख यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

 

याप्रसंगी पुढे बोलताना युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख म्हणाले, संघटनेची ताकद खूप मोठी असते या बळावरती आपण तालुक्यावर आपली सत्ता नसतानादेखील प्रशासनावर वचक ठेवू शकतो. त्यासाठी आबासाहेबांनी उभा केलेलं हे संघटन आणखी मजबूत करूया. त्या बळावरती लोकांच्या अडीअडचणी आपणास सोडवता येतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या संघटनेच्या बळावर जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यावरती एक हाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकसंधपणे सर्वजण कार्यरत राहू या. आपल्या सर्व प्रकारच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी आबासाहेबांचा आदर्श समोर ठेऊन मी सदैव कटिबद्ध आहे. आबासाहेबांनी तुम्हा सर्वांच्या आग्रहास्तव माझ्यावर सोपावलेला जनसेवेचा वसा व वारसा जोपसण्याची जबाबदारी अखंडपणे प्रामाणिक व सक्षमपणे पुढे नेण्याचे अभिवाचन दिले. तसेच चालू राजकीय घडामोडीविषयी परखडपणे विचार मांडले. तसेच जनावरांच्या लंपी आजाराविषयी मार्गदर्शन केले. 

 

सांगोल्याची ओळख म्हणजे आबासाहेब ,आणि आबासाहेब म्हणजे आदर्श, आदर्शाचे प्रतिक असा आपला तालुका पण आज परिस्थिती पाहतो. कॉमेडी आपल्यासाठी घातक आहे, ती आपल्याला पाच वर्षे मागे नेत आहे हे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सध्या सरकारची स्थिती पाहता तालुक्यात शेकापची सत्ता नसताना स्व. आबासाहेबांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता एकजूट व संघटित असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पक्षाचे संघटन पाहून मला काम करण्यास प्रेरणा मिळते. गटतट विसरुन एकसंघ होवून काम करावे लागणार आहे. पक्षबांधणीसाठी गावभेट दौर्‍याचे नियोजन आखले आहे. स्व.आबासाहेब जे करत होते ते आपणा सर्वांना यापुढे जबाबदारीने करावे लागणार आहे. गावाच्या समस्या सोडविण्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे असेही डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले.

 

डॉ.अनिकेत देशमुख यांच्या गावभेट दौऱ्यामुळे शेकापमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. स्व.आबासाहेब यांच्या विचारावर, तत्वावर डॉ.अनिकेत देशमुख यांची वाटचाल सुरु असून गावभेट दौर्‍यामुळे स्व.आबासाहेबांचे गावभेट दौर्‍याचे चित्र डोळ्यासमोर दिसत असल्याचे शेकापच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.