सांगोला नगरपरिषदमध्ये आता महिला राज

सांगोला" /> सांगोला नगरपरिषदमध्ये आता महिला राज; निवडणुकीसाठी आरक्षण सोडत संपन्न
IMG-LOGO
Home राजकारण सांगोला नगरपरिषदमध्ये आता महिला राज; निवडणुकीसाठी आरक्षण सोडत संपन्न
राजकारण

सांगोला नगरपरिषदमध्ये आता महिला राज; निवडणुकीसाठी आरक्षण सोडत संपन्न

June 2022 201 Views 0 Comment
IMG

सांगोला नगरपरिषदमध्ये आता महिला राज

सांगोला नगरपरिषदे निवडणुकीसाठी आरक्षण सोडत संपन्न 

सांगोला / प्रतिनिधी    सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंडउत्सुकता असलेल्या सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम काल सोमवार दि. १३ जून रोजी सकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे संपन्न झाला. यामध्ये १२ जागा महिलांसाठी राखीव तर ११ जागा पुरुषांसाठी ठेवण्यात आले आहेत. यामुळे पालिका सभागृहात महिलांचे राज्य येणार असून आता सांगोला शहराचा कारभार महिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सांगोला नगर परिषदेसाठी ११ प्रभाग निहाय आरक्षण सोडत सोमवारी संपन्न झाली.आरक्षण सोडत प्रसंगी जिल्हा नियंत्रण पुनर्वसन अधिकारी सोपान टपे, तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे उपस्थित होते. सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक २ अनुसुचित जाती महिला, प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जाती महिला व प्रभाग क्रमांक ८ अनुसूचित जाती सर्वसाधारण अशा चिठ्या काढण्यात आल्या. यावेळी इयत्ता पहिली व इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीमुळे सांगोला शहरात राजकीय गणिते चांगलीच बदलणार. अनेकांनी आत्तापासून तयारीला सुरवात केली आहे.अनेकांना आता स्वतः उभे न राहता आपल्या घरातील महिलांना उभे करावे लागणार असल्याचे चित्र तयार झालेले आहे.                          

              सांगोला नगर परिषदेमध्ये २३ नगरसेवक असणार आहेत. एकुण १२ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. सोडतीनंतर अनेक नगरसेवकांचे पुन्हा नगरसेवक होण्याचेस्वप्न पुळीस मिळणार आहे. तर अनेक कार्यकत्यांचे मार्ग सुखरही झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आम्हालाच अनुकूल वातावरण असल्याचे सांगत नगरपालिकेत आमची सत्ता येणार असल्याचा दावाही केला आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेकांच्या चेहन्यावर दुःख तर अनेकांच्या चेहन्यावर हास्य उमटल्याचे चित्र दिसून आले. आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडत प्रसंगी सांगोला शहरातील आजी, माजी नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी मानले. आरक्षण सोडततिच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून या कालावधीत दाखल करता येतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना एक जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले आहे.