महिममध्ये हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त

महिममध्ये हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त
IMG-LOGO
Home क्राईम महिममध्ये हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त
क्राईम

महिममध्ये हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त

September 2021 55 Views 0 Comment
IMG

महिममध्ये हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त

38 हजारांचे गूळमिश्रित रसायन जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महिम ता.सांगोला येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून 1800 लिटर गूळमिश्रित रसायन, 50 लिटर हातभट्टीची दारू, नवसागराच्या कांड्या, युरिया असा 38 हजार 074 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोकॉ धुळदेव चोरमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष मधुकर चव्हाण, संजय बुधावले, सेवागिरी बाळासो चव्हाण, काशीलिंग बाळासो चव्हाण, बाळासो धोंडिबा चव्हाण सर्व रा.चव्हाणवस्ती महिम ता. सांगोला यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

     पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत हुले, पोहेकॉ क्षीरसागर, पोकॉ धुळदेव चोरमुले असे कटफळ दुरक्षेत्रात सरकारी वाहनातून पेट्रोलींग करीत असताना   महिम येथे संतोष मधुकर चव्हाण हा संजय बुधावले यांच्या ऊसाचे शेतात तर बाळासो चव्हाण यांच्या घराजवळील विहिरीच्या झुडपात सेवागिरी बाळासो चव्हाण, काशीलिंग बाळासो चव्हाण, बाळासो धोंडिबा चव्हाण हे चोरुन हातभट्टी दारूची भटटी चालवित असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त केले. पोलिसांनी संतोष मधुकर चव्हाण व संजय बुधावले यांना ताब्यात घेऊन 16 हजार रुपयांचे 800 लिटर गुळमिश्रीत रसायन, 20 लिटर हातभट्टी दारू, 3 नवसागराच्या कांडया, 1 किलो युरीया असा 16 हजार 837 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सेवागिरी बाळासो चव्हाण, काशीलिंग बाळासो चव्हाण, बाळासो धोंडिबा चव्हाण सर्व रा .चव्हाणवस्ती महिम ता. सांगोला यांचा अवैधरित्या हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून 20 हजार रुपये किमतीचे 1000 लिटर गुळमिश्रीत रसायन, 30 लिटर हातभट्टी दारू,  3 नवसागराच्या कांडया,1 किलो युरीया असा 21 हजार 237 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोकॉ धुळदेव चोरमुले यांनी वरील पाच जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.