सुप्रसिद्ध साहित्यिकांची आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयाला भेट&n" /> सुप्रसिद्ध साहित्यिकांची आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयाला भेट
IMG-LOGO
Home सामाजिक सुप्रसिद्ध साहित्यिकांची आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयाला भेट
सामाजिक

सुप्रसिद्ध साहित्यिकांची आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयाला भेट

May 2025 18 Views 0 Comment
IMG

सुप्रसिद्ध साहित्यिकांची आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयाला भेट 

सांगोला ( प्रतिनिधी )- अहिल्यानगर येथील साहित्यिक डॉ. संजय बोरुडे त्याचबरोबर लेखिका रचना व कराडचे डॉ. बसवेश्वर चेणगे या सुप्रसिद्ध साहित्यिकांनी मंगळवारी आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाला भेट देऊन आपुलकीच्या समाजोपयोगी कार्याची प्रशंसा केली

.             अहिल्यानगर येथील डॉ. संजय बोरुडे यांची एकूण २४ पुस्तके प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचा पुरस्कार त्यांच्या "हवेलीचे रहस्य" या पहिल्याच बालकादंबरीला नुकताच प्राप्त झाला आहे. तर साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त असलेल्या साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असणारे साहित्यायन संस्था, सटाणा यांच्या  वतीने लेखिका रचना यांना अनुवादासाठी उत्तम साहित्य पुरस्कार नुकताच संमेलनाध्यक्ष दासू वैदय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर कराड अर्बन बँकेचे सांगोला शाखाधिकारी तथा साहित्यिक व गुंफण परिवाराचे संपादक जेष्ठ साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे अशा सुप्रसिद्ध तीन साहित्यिकांनी आज आपुलकी प्रतिष्ठान सांगोला कार्यालयास भेट देऊन प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्याची प्रशंसा केली. 

यावेळी अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी मान्यवर साहित्यिकांचे स्वागत करून भेटीबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी सचिव संतोष महिमकर, अच्युत फुले, अमर कुलकर्णी, मल्हार गायकवाड, सुरेश गंभीरे, ग्रंथपाल आदिनाथ घोडके आदी उपस्थित होते.