सांगोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मनोज उकळे यांची निव" /> सांगोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मनोज उकळे यांची निवड
IMG-LOGO
Home सामाजिक सांगोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मनोज उकळे यांची निवड
सामाजिक

सांगोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मनोज उकळे यांची निवड

May 2025 12 Views 0 Comment
IMG

सांगोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मनोज उकळे यांची निवड

सांगोला, तालुका प्रतिनिधी : सांगोला तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज उकळे यांची तर सचिवपदी आनंद दौंडे, कार्याध्यक्षपदी नावेद पठाण व उपाध्यक्षपदी अमेय मस्के यांची अविरोध निवड झाली.

    सोमवार (ता. १९) रोजी तालुका पत्रकार संघाची बैठक सांगोला येथील पत्रकार भवनामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या. या बैठकीसाठी अशोक बनसोडे, संजय बाबर, दिलीप घुले, दत्तात्रय खंडागळे, मिनाज खतीब, डॉ. वैभव जांगळे, किशोर म्हमाणे, मोहसीन मुलाणी इत्यादी सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अरविंद केदार यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष मनोज उकळे म्हणाले की, "संघटनेचे या अगोदर सुरू असलेल्या कार्यक्रमाबरोबरच इतर नवीन कार्यक्रमही सर्वांनुमते घेण्यात येतील." सूत्रसंचलन दत्तात्रय खंडागळे यांनी तर आभार डॉ. वैभव जांगळे यांनी मानले.