प्रा.धनाजी चव्हाण जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्काराने सन्मान" /> प्रा.धनाजी चव्हाण जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
IMG-LOGO
Home सामाजिक प्रा.धनाजी चव्हाण जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
सामाजिक

प्रा.धनाजी चव्हाण जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित

March 2025 96 Views 0 Comment
IMG

प्रा.धनाजी चव्हाण जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील प्रा.धनाजी चव्हाण यांना छत्रपती परिवार मरवडे यांचे वतीने दिला जाणारा या वर्षीचा अतिशय प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार रौप्यमहोत्सवी मरवडे फेस्टिवलनिमित्त आयोजित शिक्षक पुरस्कार सोहळ्यात महराष्ट्रातील प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांचे शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे,भगरे सामाजिक ट्रस्टच्या प्रा.सौ.वनमालाताई भगरे ,गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, माजी शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी,रयत बँकेचे माजी चेअरमन साहेबराव पवार व छत्रपती परिवाराचेपदाधिकारी उपस्थित होते.  मानाचा फेटा शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

  पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापक श्रीरंग आवळेकर गुरुजी, सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, प्रा.शिवशंकर तटाळे,प्रा.डी.के पाटील,उन्मेष आटपाडीकर, सुनील जवंजाळ उपस्थित होते. 

     प्रा.चव्हाण सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मराठी विषयाचे अध्यापक असून एक उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी चंद्रकुमार नलगे यांच्या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर एम. फील साठी संशोधन पूर्ण केले आहे.व पीएच.डी.साठी संशोधन सुरू आहे. त्यांना यापूर्वी शैक्षणिक कार्यासाठी तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मनोरमा परिवार सोलापूर, विद्यार्थी परायण शिक्षक पुरस्कार साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर,लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार सोलापूर, राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षकरत्न पुरस्कार नगर व राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला,मुंबई व सामाजिक कार्यासाठी लायन्स क्लबमधील उपविभाग,विभाग व प्रांत स्तरावरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

    या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शं.घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य,प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,प्रदिप धुकटे, मच्छिंद्र इंगोले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर,सर्व संस्था सदस्य,प्रशासन यांच्या विधायक व्यवस्थापनामधील सांगोला विद्यामंदिर ही शाळा गुणात्मकतेसाठी विद्यार्थ्यांच्या जीवनदृष्टीचा व कौशल्याचा विकास करणारी उपक्रमशील शाळा असून सृजनशील जीवनाची प्रयोगशाळा आहे.यामुळेच गेली दोन दशकाहून अधिक सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये समाजाच्या अभ्युदयासाठी संस्थापक सुरेश पवार गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली अमोघ कार्य करत वेगळी उंची प्राप्त केलेल्या छत्रपती परिवार मरवडेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.तो मनस्वी आनंद व प्रेरणा देणारा आहे. 

प्रा.धनाजी चव्हाण