बेलवणी सिल्क साडी निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून पाच वर्षां" /> बेलवणी सिल्क साडी निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये पाच हजार रोजगार निर्मितीचे लक्ष - तानाजी केदार
IMG-LOGO
Home सामाजिक बेलवणी सिल्क साडी निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये पाच हजार रोजगार निर्मितीचे लक्ष - तानाजी केदार
सामाजिक

बेलवणी सिल्क साडी निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये पाच हजार रोजगार निर्मितीचे लक्ष - तानाजी केदार

March 2025 38 Views 0 Comment
IMG

बेलवणी सिल्क साडी निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये पाच हजार रोजगार निर्मितीचे लक्ष - तानाजी केदार 

 

सांगोला/प्रतिनिधी :

 

सांगोला शहरात हातमागावर कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती. ही निर्मिती कालबाह्य होत असताना पैठणी, येवलाच्या धरतीवर सांगोल्यात बेलवणी सिल्क साडी (हस्तकला) निर्मिती करणारा प्रकल्प तरुण उद्योजक तानाजी केदार यांनी हा उद्योग सुरू केला असून या तरुण नव उद्योजकाने शहर व परिसरातील तरुणापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

 

ह्या उद्योगगामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण महिलांच्या हाताला काम मिळत असून महिलांसाठी हा प्रकल्प नाविन्यपूर्ण असल्याचे तरुण उद्योजक तानाजी केदार यांनी सांगितले. 

 

सांगोला जत रोड - रॉयल गार्डन, खारवटवाडी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित प्रथम वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा झाला. 

 

यावेळी बोलताना तानाजी केदार यांनी सांगितले की, महिलांना आर्थिक सक्षम करने याकरिताचा हा उद्योग उभारला असून बेलवणी सिल्क साडी निर्मिती (हस्तकला ) उद्योगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास सुरवात झालेली असून जगामध्ये सांगोला तालुक्याची ओळख एक संस्कृतीक तालुका म्हणून अल्पावधीत होईल 

 

 सिल्क साडी निर्मितीचे महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे 

 

सिल्क साडी निर्मिती ह्या उद्योगामुळे रेशीम उत्पादक शेतकरी ते सिल्क धागाचे प्रोसेसिंग, कलर, सांडणी, जोडणी, हातमाग निर्मिती, कारागीर, उद्योजक, दूकानदार, सिल्क साडी व्यापारी कित्येक जणांना रोजगार उपलब्ध होतं असून सांगोला तालुका हा ह्या उद्योगामुळे आगामी काळात चांगली बाजारपेठ निर्माण होवून आर्थिक उलाढालीचे केंद्र बनेल 

 

रेशीम धाग्यापासूनचे फायनल प्रॉडक्ट सिल्क साडी बनत असून अनेकांना हा उद्योग तारणहार तसेच उपजीविकेचे साधन बनत आहे

 

फॅशन व डिझाईन क्षेत्राची आवड असणाऱ्यांच्या बुद्धीला वाव व कल्पकतेला संधी मिळणार आहे 

 

यावेळी उपस्थित असणारे चंद्रकांत खरात यांच्या हस्ते नवीन बोर्ड चे पूजन झाले दत्तात्रय पाटील - सोमलिंग ग्राम विकास मंडळ गुंजेगाव, माणगंगा भ्रमणसेवा संस्थचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे , रावसाहेब पवार-जिल्हा संघटक आम आदमी पार्टी, संजीवन चव्हाण- रिटायर्ड फ़ॉरेस्ट ऑफसर, दिंगबर केदार रिटायर्ड इन्सस्पेकर यांनी रोजगार निर्मिती विषयक आपले विचार व्यक्त करून उद्योगाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती यामध्ये रुबाब काझी, राजश्री खडतरे, प्रीती खडतरे, रुपाली लेंडवे,रुपाली इंगोले, मनीषा केदार, धनश्री चोगुले, कल्याणी केदार, भारती खडतरे, शिलूताई खडतरे, पारुबाई खडतरे, कोताबाई सुरवसे , वर्षा सुरवसे, योगिता बाबर,गीतांजली केदार, छबाबाई केदार, नंदा केदार गिरीजाबाई केदार इ.उपस्थिती होती 

 

तसेच चित्तरंजन, सोमनाथ, महादेव केदार, कृष्णा साळुंखे, मधुकर सुरवसे, जगन्नाथ सुरवसे,वसंत सुरवसे, पंडित पवार - वाटणंबरे , संजय पाटील- जवळा, संजय शिंदे,राहुल,योगेश, सुनील, धनाजी,समाधान,आपसो, गोरख, शिवाजी, पांडुरंग, संतोष केदार ,तसेच केदार परिवारातील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते