सांगोला पोलिसांची उत्तम कामगिरी; मोबाईल चोरी करणारी टोळी ज" /> सांगोला पोलिसांची उत्तम कामगिरी; मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात यश
IMG-LOGO
Home क्राईम सांगोला पोलिसांची उत्तम कामगिरी; मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात यश
क्राईम

सांगोला पोलिसांची उत्तम कामगिरी; मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात यश

June 2023 204 Views 0 Comment
IMG

सांगोला पोलिसांची उत्तम कामगिरी; मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात यश

सांगोला प्रतिनिधी
विकास गंगणे

सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावर खरेदी विक्री बाजार मधून बऱ्याच प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनांना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे यांनी सांगोला पोलिसांना निर्देशित दिले होते या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणे गु र नं 530/2023 भा द वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना सांगोला आठवडा बाजार येथे दिनांक 18 6 2023 रोजी सायंकाळी गस्त करीत असताना एक महिला व दोन इसम संशरीता मोटरसायकल वरून पळून जात असताना त्यांचा सांगोला पोलीस ठाणे कडील पोलिसांना त्यांचा पाठलाग करून पकडले असता त्यांना ताब्यातून घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) बबन धुळा तुपे वय 60वर्ष,2) नितीन अर्जुन तुपे वय30वर्ष,3) महिला -शाहीद महादेव तुपे वय38 वर्ष सर्व राहणार पानगाव तालुका मान जिल्हा सातारा अशी असल्याचे सांगितल्याने सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे विचारपूस करून त्यांचे कडून फिर्यादीचे एकूण 13 महागडे मोबाईल सह गुन्ह्यात चोरी करिता वापरण्यात आलेली मोटरसायकल अशी एकूण सुमारे 3,24,500/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये विवो ओपो रेडमी रिअलमी सॅमसंग इत्यादी कंपनीचे महागडे मोबाईल आहेत सदर आरोपींना अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे आठवडा बाजार व जनावरांचा बाजार यामध्ये पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असून पोलीस ठाणे हद्दीत महूद कोळा जुनोनी घेरडी या बाजारात सुद्धा गस्त नेमण्यात येते यामुळे गत महिन्यात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात आळा बसला असून यापुढेही आठवड्या बाजारात प्रभावी गस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले. सदर मोबाईल हस्तगत करण्याची कामगिरी श्री शिरीष सरदेशपांडे ,पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री हिम्मतराव जाधव सो अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा पो.नि. श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे का़ं./1547दत्ता वजाळे पोहेका़ं264 विकास क्षीरसागर पोना/1425 बाबासाहेब पाटील, पोना/1671केदारनाथ भरमशएट्टई,पोका़ं/335 लक्ष्मण वाघमोडे, तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोहे कां़ युसुफ पठाण यांनी मदत करून सदर चोरी झालेली मोबाईल हस्तगत केले आहेत.