सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचा सेव" /> सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा ; प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त
IMG-LOGO
Home शैक्षणिक सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा ; प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त
शैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा ; प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त

May 2023 41 Views 0 Comment
IMG

सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा ; प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त

 

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला प्राचार्य लक्ष्मण जांगळे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नारायण विसापूरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्था सचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नाझरा विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,कोळा विद्यामंदिरचे पर्यवेक्षक रफिक मणेरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्राचार्य लक्ष्मण जांगळे व काकासाहेब नरूटे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. नंतर सत्कार समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 पूज्य बापूसाहेब झपके यांच्या विचाराला प्रमाण मानून आजपर्यंत सांगोला विद्यामंदिरने गुणवत्ता,शिस्त,व उपक्रमशीलता यामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक प्राचार्य या पदावर काम करताना ते जपण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.१९९० पासून २९ वर्ष सहशिक्षक व नंतर पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, प्राचार्य या पदावर प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, झपके कुंटुबिय,सर्व संस्था सदस्य , विद्यामंदिर परिवार यांच्यामुळे संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव कायम माझ्या मनात राहील.
- प्राचार्य लक्ष्मण जांगळे