शूटिंग रायफल स्पर्धेत समृध्दी चे समृध्द यश

स" /> शूटिंग रायफल स्पर्धेत समृध्दी चे समृध्द यश
IMG-LOGO
Home शैक्षणिक शूटिंग रायफल स्पर्धेत समृध्दी चे समृध्द यश
शैक्षणिक

शूटिंग रायफल स्पर्धेत समृध्दी चे समृध्द यश

February 2023 91 Views 0 Comment
IMG

शूटिंग रायफल स्पर्धेत समृध्दी चे समृध्द यश

सांगोला विद्यामंदिर ची समृद्धी भातगुंडे गोल्डन गर्ल ची भरारी मुंबईच्या राजभवनात 

सांगोला/ प्रतिनिधी 

राजभवन मुंबई येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला ची एन. सी. सी ची विद्यार्थिनी समृध्दी नागनाथ भातुंगडे हीची सोलापूर जिल्ह्याची सुवर्ण कन्या म्हणून निवड करण्यात आली. तिच्या एनसीसीच्या कारकिर्दीत व आपल्या रायफल शूटिंगच्या जोरावर महाराष्ट्र डायरेक्टेड च्या शूटिंग टीमचे नेतृत्व करत असताना दिल्ली येथे सप्टेंबर मध्ये झालेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प मध्ये समृध्दी हिने गोल्ड मेडल मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.त्यामध्ये 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर व सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील पहिली जूनियर विंग आर्मी जेडब्ल्यूए होण्याचा मान समृद्धी भातुंगडे हिने मिळवला.संपूर्ण 

राष्ट्रीय स्तरावर भारतातील इतर सर्व राज्यातील शूटर या स्पर्धेत आपापल्या राज्याचे नेतृत्व करत असतात एकूण 17 डायरेक्टर मधून ते सहभागी झाले होते. येथील फायरिंग सिलेक्शन प्रोसेस ही अतिशय अवघड व खडतर जोखमीची आहे.यामध्ये बटालियन इंटर ग्रुप , डायरेक्टेट मधून निवड केली जाते 

 या शूटिंग रायफल स्पर्धे मधील समृद्ध यशा नंतर समृद्धीचा सत्कार महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोशारी तसेच महाराष्ट्राचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल मेजर वाय. पी खंडूरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजभवन येथे संपन्न झाला. यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेची कन्या समृद्धी हीच सत्कार करून तिला रोख पारितोषिके देण्यात आली.

महाराष्ट्राच्या राज्यपालांसारख्या उच्च पदी विराजमान असलेल्या मान्यवरांकडून सन्मानित होणारी सांगोल्यातील पहिलीच एनसीसी कॅडेट ठरली.समृद्धीला फायरिंगचे मार्गदर्शन एन एस ओ श्री मकरंद अंकलगी सर व उज्वला कुंभार मॅडम यांनी दिले. या कामगिरीबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्राध्यापक पी.सी झपके सर, सचिव म.शं. घोंगडे सर, सहसचिव प्रशुध्दचंद्र झपके , सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य ल. आ. जांगळे, उपप्राचार्य ग.ना. घोंगडे, सुपरवायझर अ.प्र.बारबोले, पोपट केदार ,बी.एस. माने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समृद्धीचे व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

 

 

माझी सोलापुर जिल्ह्याची 'गोल्डन गर्ल' म्हणजेच 'सुवर्ण कन्या' म्हणून निवड झाली याचे श्रेय ती श्री अंकलगी सर, माझे आई,वडिल व काका - काकुंना जाते. स्वतःची रायफल नसताना शूटिंग स्पर्धेतील गोल्ड मेडल मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंतचा माझा प्रवास सोपा नव्हता. यामध्ये मला भरपूर अडथळे आले या अडथळ्याना पार करून यथाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचे काम गुरुवर्य मकरंद अंकालगी सर व उज्वला कुंभार मॅडम यांनी केले.

समृध्दी नागनाथ भातुंगडे

(सुवर्ण कन्या एन सी सी कॅडेट )