सांगोल्यात गुटखा विक्री तेजीत, वर्षभरात सव्वा कोटींचा गुटखा ज" /> गुटखा बंदी केराच्या टोपलीत, कारवाईकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
IMG-LOGO
Home क्राईम गुटखा बंदी केराच्या टोपलीत, कारवाईकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
क्राईम

गुटखा बंदी केराच्या टोपलीत, कारवाईकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

December 2022 76 Views 0 Comment
IMG

सांगोल्यात गुटखा विक्री तेजीत, वर्षभरात सव्वा कोटींचा गुटखा जप्त

 

गुटखा बंदी केराच्या टोपलीत, कारवाईकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष 

 

 

सांगोला (प्रतिनिधी): गुटखा आरोग्यास हानिकारक असल्याने राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी गुटखा बंदी केली आहे. तरूण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी गुटखा उत्पादन व विक्रीसाठी सरकारने बंदीचा आदेश काढला. गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी व तंबाखूवर बंदी घातली असली तरी परराज्यातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येत आहेत. बंदी असतानाही सांगोला पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या वर्षभरात शहर आणि तालुक्यातून गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल १ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही सांगोला शहर व तालुक्यात गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

        गुटखा आणि पानमसाला विक्रीला पूर्णतः बंदी असतानाही परराज्यातून सांगोला शहर व तालुक्यात अवैधरित्या चोरी-छुपे गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, आणि पानमसाला सर्रासपणे मिळताना दिसत आहे.  

बाहेरून रात्री-अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून गुटखा पोहच होतो. गुटख्याच्या पुड्यांच्या माळा तरटाच्या पोत्यात खचाखच भरलेल्या असतात. रातोरात गुटख्याची पोती दुचाकी-चारचाकीतून विक्री केला जातो. सांगोला शहर व तालुक्यातील रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुड्या दिसून येतात. तर शासकीय कार्यालयाचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कानेकोपरे गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? असा प्रश्न अनेकाकडून उपस्थित केला जात आहे.

       गेल्या वर्षभरात सांगोला शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनामार्फत कारवाया करून १ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला वाहनांसह जप्त केला आहे. बंदी असतानाही खुलेआम गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुटख्यामुळे तरुणाई कर्करोगाच्या विळख्यात आहे. त्यांचे पारिवारीक व आर्थिक संतुलन पूर्णपणे कोसळून गेले आहे. गुटखाबंदीला लागलेले ग्रहण हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही सुटलेले नाही. एकवेळ अत्यावश्यक वस्तू मिळणार नाहीत, मात्र गुटखा, सुगंधी तंबाखू नक्की मिळणार अशी वस्तुस्थिती आहे.

 

 

 

 

 

गुटखा विक्रेत्यांवर किंवा साठेबाजांवर करण्यात आलेल्या कारवाया या पोलिस विभागाकडून करण्यात आल्यान आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाला याबाबत सर्वकाही माहिती असतांना हा विभाग निद्रावस्थेत असल्याची चर्चा रंगत आहे.राज्य सरकारने 2012 पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली. प्रत्यक्षात मात्र कायदा धाब्यावर बसवून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस विक्री सुरूच आहे. कर्नाटकातून छुप्या पद्धतीने गुटखा महाराष्ट्रात पोहोचतो. जागोजागी मिळणाऱ्या गुटख्यामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.