सांगोल्यात वर्षभरात एक कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

 

अवैध दारु विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभाग कोमात
IMG-LOGO
Home क्राईम अवैध दारु विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभाग कोमात
क्राईम

अवैध दारु विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभाग कोमात

December 2022 108 Views 0 Comment
IMG

सांगोल्यात वर्षभरात एक कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

 

 

अवैध दारु विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभाग कोमात 

 

 

सांगोला (प्रतिनिधी): गेल्या वर्षभरात सांगोला पोलिसांनी अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत सुमारे सहा लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात फक्त दोनच कारवाया केल्या असून 1 कोटी 1 लाख 84 हजार 425 रुपयांचा मद्यसाठा व वाहन जप्त केले आहे. तालुक्यात मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री होत असतानाही कारवाई करण्याकडे उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करत असल्याचे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

     राज्य सरकारचा महसूल चुकवून गोवा बनावटीचे मद्य छुप्या मार्गाने सांगोला तालुक्यात आणणारी यंत्रणा सक्रीय झाली आहे. बेकायदा दारू विक्री, वाहतूक, बनावट मद्यनिर्मिती रोखण्याची तसेच कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. मात्र अवैधरित्या दारू विक्रीकडे या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सांगोला तालुक्यात मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात फक्त दोनच कारवाया केल्या असून मद्यसाठा व वाहन मिळून 1 कोटी 1 लाख 84 हजार 425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

       तर सांगोला पोलिसांनी अवैध मद्यवाहतूक वा विक्री करणारी वाहने, देशी-विदेशी दारूची विक्री करणारी ठिकाणे, हातभट्टी दारूनिर्मिती अड्ड्यावर छापे टाकून 5 लाख 61 हजार 846 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये खुलेआम अवैधपणे गावठी दारू तयार करून त्याची विक्री केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचे कारवाई करण्याकडे जाणीवपुर्णक दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा लाखोंचा महसुल बुडत आहे. गेल्या काही दिवसांत ज्या काही कारवाया झाल्या त्या पोलीसांनीच केल्या आहेत, त्यामुळे सांगोला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग काय करत आहे, असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे.

 

 

 

 

 

सांगोला तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अवैध दारू वाहतूक, तस्करी, विक्री करणाऱ्या दारू माफियावर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने अवैध हातभट्टी दारूचे अड्डे जोमात असून यामुळे हजारो संसार या व्यसनामुळे उघड्यावर आले आहेत. ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केल्याने अवैध हातभट्टी दारू गाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातूनच तरूणांना हातभट्टीचे व्यसन लागले असल्याचे चित्र आहे.