ट्रॅक्टर चालकावर चाकू, लोखंडी रॉड, कोयत्याने वार करत खुनी हल्ल" /> झापाचीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
IMG-LOGO
Home क्राईम झापाचीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

झापाचीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

December 2022 135 Views 0 Comment
IMG

ट्रॅक्टर चालकावर चाकू, लोखंडी रॉड, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

 

झापाचीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): तू या रस्त्याने जायचे नाही असे म्हणून चौघांनी मिळून शेतात फवारणी करून ट्रॅक्टर घेवून घरी जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर चाकू, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करून खुनी हल्ला केल्याची घटना झापाचीवाडी ता. सांगोला येथे घडली आहे. याप्रकरणी संजय यशवंत आलदर रा. झापाचीवाडी ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाधान आप्पासो आलदर, आप्पासो मारुती आलदर, रंजना आप्पासो आलदर, सारीका समाधान आलदर सर्व रा. झापाचीवाडी ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी, संजय यशवंत आलदर रा.झापाचीवाडी ता. सांगोला हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता शेतामध्ये ट्रॅक्टर घेवून फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणी करून 9.30 वाजता संजय आलदर घरी जाण्यासाठी निघाले असताना दत्तू आलदर व समाधान आलदर यांच्या बांधजवळ समाधान आप्पासो आलदर, आप्पासो मारुती आलदर, रंजना आप्पासो आलदर, सारीका समाधान आलदर सर्व रा. झापाचीवाडी सांगोला हे त्यांच्या शेताच्या बांधाजवळ थांबले होते. त्यावेळी समाधान आलदर याचे हातात लोखंडी रॉड, आप्पासो आलदर यांचे हातात लोखंडी कोयता तर रंजना आलदर हीचे हातात खोऱ्या होता. त्यावेळी समाधान आलदर याने तू या रस्त्याने जायचे नाही असे म्हणून समाधान आलदर याने लोखंडी रॉडने संजय आलदर यास मारण्यासाठी आला असता रॉड डावे हाताचे कोपरास लागला. त्यावेळी ट्रॅक्टर मधून उतरून पळून जात असताना आप्पासो आलदर, रंजना आलंदर व सारीका आलदर यांनी संजय यास पकडून आज याला सोडायचे नाही, याचा खेळ संपवून टाकू असे म्हणून समाधान आलदर याने लोखंडी चाकूने संजय यांच्या पोटात खुपसून वार केले. 

        आप्पासो आलदर याने त्याचे हातातील लोखडी कोयत्याने पोटावर व उजवे बाजुस कंबरेवर वार केले. समाधान आलदर व आप्पासो आलदर यांनी मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने आरडाओरड करताच अजित आलदर, समाधान शिवाजी आलदर रा. झापचीवाडी तेथे आले. त्यावेळी समाधान आप्पासो आलदर, आप्पासो मारुती आलदर, रंजना आप्पासो आलदर व सारीका समाधान आलदर हे तेथून पळून गेले. जखमी झालेल्या संजय आलदर यांना उपचारासाठी सांगोला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी संजय यशवंत आलदर रा. झापाचीवाडी ता. सांगोला यांनी समाधान आप्पासो आलदर, आप्पासो मारुती आलदर, रंजना आप्पासो आलदर, सारीका समाधान आलदर सर्व रा. झापाचीवाडी ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.