केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, कोब्रा कमंडो, पोलीस निरीक्षक रामचं" /> केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, कोब्रा कमंडो, पोलीस निरीक्षक रामचंद्र दिवसे साहेब हे 40 वर्षाच्या देश सेवेनंतर सेवानिवृत्त
IMG-LOGO
Home सामाजिक केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, कोब्रा कमंडो, पोलीस निरीक्षक रामचंद्र दिवसे साहेब हे 40 वर्षाच्या देश सेवेनंतर सेवानिवृत्त
सामाजिक

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, कोब्रा कमंडो, पोलीस निरीक्षक रामचंद्र दिवसे साहेब हे 40 वर्षाच्या देश सेवेनंतर सेवानिवृत्त

December 2022 288 Views 0 Comment
IMG

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, कोब्रा कमंडो, पोलीस निरीक्षक रामचंद्र दिवसे साहेब हे 40 वर्षाच्या देश सेवेनंतर सेवानिवृत्त

 

सेवानिवृत्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचा गौरव ; निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशा शुभेच्छांचा वर्षाव

 

सांगोला प्रतिनिधी

सी. आर. पी. एफ. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, कोब्रा कमंडो, तसेच यु.पी.एस.सी. प्रशिक्षक तथा सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक रामचंद्र प्रल्हाद दिवसे साहेब हे 40 वर्षे सेवा बजाविल्यानंतर काल गुरुवार दिनांक ०१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल सी. आर. पी. एफ. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल तसेच सांगोला शहर व तालुक्यातून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत, यापुढील काळात निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

    आलेगाव ता. सांगोला येथील रहिवाशी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रामचंद्र प्रल्हाद दिवसे साहेब यांनी देशाच्या कानाोपऱ्यात म्हणजेच आसाम, मणिपूर, जम्मू-काश्मीर या ठिकाणी प्रदीर्घ देशसेवा बजावली आहे. तसेच यू.पी.एस.सी. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. तसेच देशातील 8 लाख लोकांपैकी 1 हजार 500 मध्ये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रामचंद्र प्रल्हाद दिवसे साहेब हे कोब्रा कमांडो म्हणून देशसेवेसाठी कार्यरत होते. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेकदा सी. आर. पी. एफ. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल यामधील वरिष्ठांकडून तसेच वेगवेगळ्या विभागातील संघटना यांच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला आहे. 

    40 वर्ष देश सेवा बजावल्यानंतर ते गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा सर्व स्तरातून यथोचित सन्मान केला जात आहे. तसेच पुढील दीर्घायुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.