ग्रामसेविका सौ. स्वप्नाली रुपनर यांच्या निधनाने कडलास गावावर " /> ग्रामसेविका सौ. स्वप्नाली रुपनर यांच्या निधनाने कडलास गावावर शोककळा
IMG-LOGO
Home क्राईम ग्रामसेविका सौ. स्वप्नाली रुपनर यांच्या निधनाने कडलास गावावर शोककळा
क्राईम

ग्रामसेविका सौ. स्वप्नाली रुपनर यांच्या निधनाने कडलास गावावर शोककळा

November 2022 64 Views 0 Comment
IMG

ग्रामसेविका सौ. स्वप्नाली रुपनर यांच्या निधनाने कडलास गावावर शोककळा

        सांगोला (प्रतिनिधी) :शासकीय काम आटपून सांगोल्याहून घराकडे निघालेल्या ग्रामसेविकेच्या स्कुटीला कंटेनरने ओव्हरटेक करताना धडक दिल्याने स्कुटीवरील ग्रामसेविकेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास कडलास (ता. सांगोला) येथे घडली आहे.सौ.स्वप्नाली रुपनर (वय 35 वर्षे, रा. कडलास, ता. सांगोला) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळालेल्या महिला ग्रामसेविकेचे नाव आहे.

 

त्या सध्या बुरंगेवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे माहेर मेडशिंगी व सासर कडलास आहे. अतिशय संघर्षमय जीवन जगून त्यांनी हे सर्व यश प्राप्त केलं होतं. दारे धरण्यापासून, शेतीची सर्व कामे,त्या करायच्या. त्यांचे वडील एस.टी. मेकॅनिक होते. दोन्ही भावांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर त्यांचे पती श्री. अरविंद रुपनर हे कडलास हायस्कूल कडलास येथे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करतात. 

 

 दत्तनगर येथे 30 ते 35 महिलांचा बचत गट उभा करून 15 लाख रुपयांचा निधी आणण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या होत्या. वाडी व गाव आदर्श करण्याकडे त्यांचा ओढा होता. विविध शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांना संगीताची आवड होती, तबलावादन शिकत होत्या. त्यांच्या निधनाने कडलास, मेडशिंगी बुरंगेवाडी व सांगोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात सासू, पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

       त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी दत्तनगर, कडलास येथे सकाळी आठ वाजता होणार आहे.