हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सांगोलाकरांनी पुढाक" /> हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सांगोलाकरांनी पुढाकार घ्यावा: मुख्याधिकारी कैलास केंद्रे
IMG-LOGO
Home सामाजिक हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सांगोलाकरांनी पुढाकार घ्यावा: मुख्याधिकारी कैलास केंद्रे
सामाजिक

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सांगोलाकरांनी पुढाकार घ्यावा: मुख्याधिकारी कैलास केंद्रे

July 2022 177 Views 0 Comment
IMG

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सांगोलाकरांनी पुढाकार घ्यावा: मुख्याधिकारी कैलास केंद्रे

शहरात ६००० ध्वज उभारण्याचे नगरपरिषदेचे उद्दिष्ट

सांगोला (तालुका प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रमातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रमात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाणे सांगोला नगरपरिषदेकडून हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत शहरात एकूण ६००० राष्ट्रध्वज उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

        मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा हा उपक्रम जनमानसात पोहोचविण्याच्या करिता सांगोला नगरपरिषदेकडून अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून उपक्रमाचा प्रचार, प्रसार तसेच झेंड्याची उपलब्धता अश्या दुहेरी आघाड्यांवर काम सुरू आहे.शाळा,महाविद्यालय, बँका, बचत गट, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व विविध आस्थापना यांच्या बैठका घेऊन झेंडे खरेदीसाठी त्यांची मदत घेणे तसेच अभियानाला संपूर्ण शहरात पोहचविण्यासाठी तिरंगा व्होलेनटीयर यांची नियुक्ती करण्याचे नगरपरिषद मार्फत नियोजन करण्यात आले आहे. प्रभातफेरी, पथनाट्ये, पोवाडे अश्या पारंपरिक पद्धती बरोबरच समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून अभियानाचा प्रचार, प्रसार करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिली.

        हर घर तिरंगा अभियानाच्या प्रभावी अंमलजावणीसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा टास्क फोर्स गठीत केली असून यात लेखापाल विजयकुमार कन्हेरे, योगेश गंगाधरे, अमित कोरे, नयन लोखंडे, शरद चव्हाण, बिरप्पा हाके यांचा समावेश आहे. विविध घटकांच्या आढावा बैठका घेणे, तिरंगा व्होलेनटीयर यांच्या नेमणुका करणे, अभियानात जास्तीत जास्त नागरिकांना जोडणे याची जबाबदारी या तिरंगा टास्क फोर्स वर सोपविली असल्याची माहिती केंद्रे यांनी दिली.

 

 

 

ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणी जाग्या करून देशाभिमान जागृत करण्यासाठी सांगोला शहरातील प्रत्येक नागरिकाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर, दुकानावर, शासकीय तसेच खाजगी कार्यालयांवर ध्वज संहितेचे पालन करून तिरंगा फडकवून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करायचे आहे.

कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद