राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 56 लाखांचा मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 56 लाखांचा मद्यसाठा जप्त
IMG-LOGO
Home क्राईम राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 56 लाखांचा मद्यसाठा जप्त
क्राईम

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 56 लाखांचा मद्यसाठा जप्त

October 2021 255 Views 0 Comment
IMG

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 56 लाखांचा मद्यसाठा जप्त

सांगोला (तालुका प्रतिनिधी): गोव्यातून महाराष्ट्रात ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने सांगोला तालुक्यातील कटफळ हद्दीत मोठी कारवाई केली. या कारवाईत 25 हजार 344 विदेशी दारूच्या बाटल्या व ट्रक असा 56 लाख 29 हजार 975 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालिका श्रीमती उषा वर्मा यांच्या आदेशान्वये उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

       याबाबत सविस्तर माहिती अशी, गोव्यातून महाराष्ट्र हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागातील भरारी पथकाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालिका श्रीमती उषा वर्मा यांच्या आदेशान्वये उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मीक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माळशिरस व पंढरपूर विभागाचे निरीक्षक यांनी 2 ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या हददीत आटपाडी-पंढरपूर रोडवर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणारा एम.एच.14 ई.एम.4495 हा ट्रक पकडला. 

       या कारवाईत इंम्पीरीयल ब्लू व्हिस्कीच्या 900 सिलबंद बाटल्या (75 बॉक्स), इंम्पीरीयल ब्लू व्हिस्कीच्या 23904 सिलबंद बाटल्या (498 बॉक्स), रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 540 सिलबंद बाटल्या तसेच एम.एच.14 ई.एम.4495 हा ट्रक व इतर साहीत्य असा 56 लाख 29 हजार 975 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ज्ञानेश्वर अशोक भोसले रा. पोखरापूर, ता.मोहोळ यास अटक केली आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक संजय बोधे, शहाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, प्रविण पुसावळे, गणेश सुळे व जवान प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख,भरत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीश पोंधे, अनिल थोरात व तानाजी जाधव यांनी सहभाग घेतला.