IMG-LOGO
Home क्राईम बंद घराचा दरवाजा उघडून सव्वा लाखाचे दागिने लंपास.
क्राईम

बंद घराचा दरवाजा उघडून सव्वा लाखाचे दागिने लंपास.

September 2021 107 Views 0 Comment
IMG

बंद घराचा दरवाजा उघडून सव्वा लाखाचे दागिने लंपास

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उघडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 27 हजार 356 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वासूद, केदार मळा, या ठिकाणी घडली. वारंवार चोरीच्या घटना होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान सांगोला पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

      वासुद केदार मळा ता. सांगोला येथील सुनंदा पांडुरंग केदार व त्यांची सून ज्ञानेश्वरी विकास केदार या दोघी नेहमीप्रमाणे स्वंयपाक खोलीचा दरवाजा बंद करुन त्यास बाहेरुन कडी लावून दुसऱ्या खोलीमध्ये जेवणखान करून झोपल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीस बाहेरून कडी लावून स्वयपांक खोलीचा दरवाजा उघडून कपाटातील 96 हजार 140 रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, 13 हजार 200 रुपयांचे दोन ग्रॅमची सोन्याची डोरली व मणी, 5 हजार 520 रुपयांची एक ग्रॅमची सोन्याची अंगठी, 2 हजार 354 रुपयांचे चांदीचे पैंजण, 1 हजार 054 रुपयांची चांदीची जोडवी, 1 हजार 054 रुपयांचा चांदीचा छल्ला,1 हजार 054 रुपयांचा चांदीचा करंड, 930 रुपयांचा चांदीचा बाळकृष्ण, 1 हजार 775 रुपयांची चांदीची वाटी, 1 हजार 775 रुपयांचे चांदीचे पैंजण, 2 हजार 500 रुपये रोख रक्कम असा 1 लाख 27 हजार 356 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

   दरम्यान पहाटेच्या सुमारास सुनंदा केदार व सुन ज्ञानेश्वरी केदार या दोघी बाथरुमला जाण्यासाठी उठल्या असता दरवाजा उघडत नसल्याने व बाहेरुन कोणीतरी कडी लावल्याचे समजले. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी जाऊ मनिषा दत्तात्रय केदार यांना फोन करुन बोलविले. त्यांनी दरवाजाची कडी उघडल्यानंतर शेजारील स्वयपांक खोली उघडी असल्याचे दिसून आले. त्यानंतर खोलीत गेल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सुनंदा पांडुरंग केदार यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.