50 लाखां" /> कोंबड वाडी येथे अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई
IMG-LOGO
Home क्राईम कोंबड वाडी येथे अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई
क्राईम

कोंबड वाडी येथे अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई

September 2021 105 Views 0 Comment
IMG

कोंबडवाडी येथील अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई

50 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोंबडवाडी ता.सांगोला येथील ओढ्याच्या शेजारी मोकळ्या जागेत होणाऱ्या विनापरवाना वाळू उपशावर पोलिसांनी कारवाई करून एक ट्रक, दोन टिप्पर, एक जेसीबी असा असा 50 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई 10 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी पोलीस नाईक विजय थिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजी आनंदा माने रा.बोरगाव ता. तासगाव जि. सांगली, दऱ्याप्पा विठ्ठल माळी रा. आंधळगाव ता. मंगळवेढा, राजाराम हुमान्ना येड्डे रा.भालेवाडी ता. मंगळवेढा, सुखदेव निवृत्ती कोळेकर यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

     याबाबत अधिक माहिती अशी सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल चौगुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल काझी, पोलीस नाईक विजय थिटे असे कोळा दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कोंबडवाडी गावातील ओढ्याच्या शेजारी मोकळ्या जागेतून एक ट्रक व दोन टिप्पर जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून भरत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सदरच्या ठिकाणी छापा टाकला असता ट्रकमध्ये जेसीबीच्या साह्याने वाळू भरत असल्याचे दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी दहा लाख 60 हजार रुपये किमतीचा एम.एच. 50-2799 या क्रमांकाचा ट्रक, दहा लाख रुपये किमतीचा एम.एच.13 सी.यू. 2484 या क्रमांकाचा टिपर, दहा लाख रुपये किमतीचा एम.एच.16 सीसी 4877 या क्रमांकाचा टिपर व वीस लाख रुपये किमतीचा बिगर नंबरचा जेसीबी असा 50 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी संभाजी आनंदा माने रा.बोरगाव ता. तासगाव जि. सांगली, दऱ्याप्पा विठ्ठल माळी रा. आंधळगाव ता. मंगळवेढा, राजाराम हुमान्ना येड्डे रा.भालेवाडी ता. मंगळवेढा या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान जेसीबी चालक सुखदेव निवृत्ती कोळेकर हा पळून गेला. या प्रकरणी पोलीस नाईक विजय थिटे यांनी वरील चौघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.