अफगान मे आंतंकी सरकार; आतंकी मंत्री, सावधान रहे मददगार औ" /> अफगान मे आंतंकी सरकार; आतंकी मंत्री, सावधान रहे मददगार और हिमायती.
IMG-LOGO
Home क्राईम अफगान मे आंतंकी सरकार; आतंकी मंत्री, सावधान रहे मददगार और हिमायती.
क्राईम

अफगान मे आंतंकी सरकार; आतंकी मंत्री, सावधान रहे मददगार और हिमायती.

September 2021 244 Views 0 Comment
IMG

 

 अफगान मे आंतंकी सरकार; आतंकी मंत्री, सावधान रहे मददगार और हिमायती.

नागपूर( रमेश लांजेवार)

सरकार स्थापण करणाऱ्या देशाच्या हातात पेन व चांगले विचार असतात.परंतु जगात हे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे की तालिबानच्या रूपात हातात बंदूक,डोक्यात आतंकी विचार,सुडबुध्दीची कल्पना व घृणास्पद अत्याचाराचे तांडव यामुळेच अनेक राष्ट्र तालिबान सोबत संबंध ठेवायचे की नाही या विचारात दिसत आहे.कारण तालिबान सरकारमध्ये नामी,खुंखार व मोस्ट वॉन्टेड आतंकवादी सहभागी झाले आहेत.तालिबान ९/११ ला सरकार स्थापण करून अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या प्रयत्न करू शकते याला नाकारता येत नाही.अमेरिकन सैनिकांचा परतीचा प्रवास सुरू होताक्षणी अवध्या १०० दिवसात तालिबानने अफगाणिस्तानवर आपली पकड मजबूत केली आणि अमेरिकेने अफगान नागरिकांना रक्ताच्या लाथोळ्यात लोटुन पसार झाला.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तालिबानने १५ ऑगस्टला स्वत:ला स्वतंत्र घोषित करून घेतले.म्हणजेच तालिबानने १५ ऑगस्टला अफगाणिस्तानवर आपला झेंडा फडकावला.त्याचप्रमाणे अवघ्या पंधरा दिवसात म्हणजे ३ सप्टेंबर २०२१ तालिबानने सरकार स्थापन केली आणि आता स्थायी सरकार स्थापनेची तारीख ९/११ राहु शकते याला नाकारता येत नाही.कारण तालिबानला अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळायचे आहे यात मुख्यत्वे करून हात आहे पाकिस्तान व चीन यांचा.अफगानिस्तानमधील घटनाक्रमावरून स्पष्ट दिसून येते की अमेरिकेच्या चुकांचे प्रायचीत्य स्वत: अमेरिकेला, मित्रराष्ट्रांना,जगाला आणि अफगाण नागरिक भोगावे लागत आहे.पाकिस्तान तालिबानला हाताशी घेऊन भारतात आतंकवादी कारवाया करण्याच्या तयारीत आहे.परंतु पाकिस्तानला ग्यात असले पाहिजे की भारताच्या वाटेला जाने म्हणजे आगीशी खेळल्या सारखे होईल.त्यामुळे पाकिस्तानने भारतापासून सावध रहाले तर बरे होईल.तालिबान सरकार स्थापणेत पाकिस्तान व चीन यांचे संपूर्ण सहकार्य आहे.कारण पंजशीर वर पाकिस्तानने हवाई हल्ले केले हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे सरळ उल्लंघन आहे.त्यामुळे तालिबानचे आतंकीमंत्री पाकिस्तान व चीनची कटपुतली बनल्याचे दिसून येते.१५ ऑगस्टलाच तालिबानवर कब्जा का? यामागे पाकिस्तान व चीनचा अवश्य हात असल्याचे दिसून येते.कारण १५ ऑगस्टला जगाचा शांतीचा दुत समजल्या जाणारा भारत स्वतंत्र झाला.परंतु त्याच्या विपरीत तालिबानने पाकिस्तान व चीनच्या मदतीने १५ ऑगस्ट २०२१ ला संपूर्ण अफगाणिस्तानला रक्तरंजीत करून काबीज केले व अफगाणिस्तान आतंकवाद्यांचा देश बनला.आता चीन आणि पाकिस्तान मुद्दाम अफगाणिस्तान सरकारची स्थापणा ११ सप्टेंबर २०२१ ला करण्याच्या तयारीत आहे.कारण अमेरिकेचे कट्टर दुश्मन रशिया,चीन आणि पाकिस्तान आहे.त्यामुळे ११ सप्टेंबर स्थापनेची तारीख निश्चित होवु शकते.यामागचा उद्देश म्हणजे एकीकडे अमेरिका व अमेरिकन नागरिक ९/११ ला श्रद्धांजलीचा कार्यक्रम करून शोक प्रगट करणार!तर दुसरीकडे अमेरिकेवर ९/११ ला हल्ला करणारे आतंकवादी ११ सप्टेंबरला सरकार स्थापन करून फटाके फोडणार ही घटना सुपर पॉवर अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणार हेही तेवढेच सत्य आहे.सध्या अफगाणिस्तानमध्ये व जगामध्ये जी उलथापालथ सुरू आहे त्याला दोषी फक्त अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन आहेत.समजा तालिबानने ११ सप्टेंबरला सरकार स्थापन केले तर ही बाब स्पष्ट होईल की तालिबान कडुन अमेरिकेला जशास तसे उत्तर असे होईल.कारण अमेरिकेतील हल्ल्याचा सूत्रधार आणि अल कायदाचा सुप्रिमो ओसामा बिन लादेन याला तालिबानचे संपूर्ण समर्थ होते.कारण कोणीही असो शेवटी आतंकवादी तो आतंकवादीच असतो.त्यामुळे त्यांच्याजवळ दया-माया नावाचा शब्दच किंवा विचार मुळातच नसतात.त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन्याच्या दृ‌ष्टीने हालचालीं दीसुन येत आहे त्या ११ सप्टेंबरच्या दृष्टीकोनातून सुरू असल्याचे दिसून येते.सध्या तालिबानची चाबी पाकिस्तान व चीनच्या हातात आहे.त्यामुळे तालीबानी चीन आणि पाकिस्तानची कटपुतली बनल्याचे दिसून येते.परंतु पाकिस्तान व चीनने लक्षात ठेवले पाहिजे की तालिबान केंव्हाही व कधीही डंख मारू शकते याला नाकारता येत नाही.कारण अफगानीस्तानची परिस्थिती पहाता संपूर्ण शेजारी राष्ट्र चिंतामग्न आहे.कारण आतंकवादी कोणाचेही होवु शकत नाही.अफगान सरकारमध्ये बाहेरील देशांच्या हस्तक्षेपाची चिंता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ब्रिक्स संमेलनात व्यक्त केली.ब्रिक्स (BRICS)सम्मेलनात पुतीन म्हणाले की आतंकवादावर नियंत्रण जरूरीचे आहे.परंतु मी म्हणतो की अफगाणिस्तानमध्ये जर आतंवाद्यांचीच सरकार बनत असेल व जगातील काही महत्त्वपूर्ण राष्ट्र त्यांना मदत करीत असेल तर आंतंकवाद्दांवर नियंत्रण कसे ठेवता येईल? याचा विचार संयुक्त राष्ट्र,आशिया खंडातील देशांनी व ब्रिक्स देशांनी केला पाहिजे.कारण तालिबानी हे आतंकवादीच त्यामुळे त्यांचे आचार- विचार आणि रहाणीमान आतंकवाद्यांप्रमाणेच रहाणार.त्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तान आतंकवादी तर होणार नाही ना? अशी चिंता सर्वांच्या मनात भेडसावत आहे.त्यामुळे जगातील देशांच्या सुरक्षेची चिंता आनखीनच गडद झाली आहे.पाकिस्तानने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की तालिबानला जेवढे डोक्यावर चढवीले आहे तेवढेच त्याच्या देशाचे तुकडे-तुकडे होईल.त्यामुळे रशियासह अन्य देशांनी पाकिस्तानवर लगाम कसने जरूरीचे झाले आहे.पाकीस्तानवर लगाम कसने म्हणजेच आतंकवाद्यांवर लगाम कसने होय.ब्रिक्स सम्मेलनात पुतीन यांनी अफगाणिस्तानचा मुद्दा उचलल्यामुळे सर्वच देश जागृत झाले असतील.सध्याच्या परिस्थितीत तालीबानचा पाकिस्तानमध्ये वाढता लोंढा पहाता पाकिस्तानी जनता परेशान असल्याचे दिसून येते.कारण तालिबानचा पाकिस्तानात प्रवेश म्हणजे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणे व ड्रग्ज माफीया निर्माण होने ही बाब पाकिस्तान जनतेला पसंत नाही.कारण तालिबान्यांची क्रृरता आणि महिलांवरील अत्याचार आताही सुरूच आहे.त्यामुळे अफगाणिस्तान जनतेची हालत आणखीनच खराब झाली आहे.त्यामुळे तालिबानच्या प्रत्येक शेजारी राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे.तालिबान सरकार स्थापनेपासून सिमावर्ती भागात अशी परिस्थिती झाली आहे की "ना बंदूक ना बंम सरहद्दपर अदृश्य दुश्मन".असे दृष्य दिसत आहे.अमेरिकेच्या नाकामीचा फायदा पाक-चीन पुर्णपणे उचलतांना दिसत आहे.त्यामुळेच तालिबानवर पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा ( ISI )आय एस आयचे व हक्कानी नेटवर्कचे संपूर्ण नियंत्रण असल्याचे दिसून येते.अशा परिस्थितीत तालिबानमध्ये केव्हाही कधीही विद्रोह होवु शकते.कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा अत्याचार सुरूच आहे.

लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार.

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.