पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीचे अड्डे केले उध्वस्त

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीचे अड्डे केले उधवस्त
IMG-LOGO
Home क्राईम पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीचे अड्डे केले उधवस्त
क्राईम

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीचे अड्डे केले उधवस्त

September 2021 85 Views 0 Comment
IMG

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीचे अड्डे केले उध्वस्त

3 हजार लिटर गूळमिश्रित रसायन, 61 हजारांचा मुद्देमाल जप्त

सांगोला (तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातभट्टीचे अड्डे सक्रीय असून ही गावठी दारू चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. पोलिसांकडून यावर वारंवार कारवाया होत असल्या तरी काही जणांकडून गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचे प्रकार सुरूच आहेत. सांगोला पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गावठी हातभट्टी बनवण्याचे तीन अड्डे उध्वस्त करण्यात आले असून तीन हजार लिटर गूळमिश्रित रसायन, 27 लिटर तयार हातभट्टीची दारू, 6 नवसागराच्या कांड्या, 3 किलो युरिया असा 61 हजार 161 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदा उर्फ आण्णा राजाराम सावंत रा लोटेवाडी ता. सांगोला, मधुकर दादु चव्हाण रा.पाचेगाव ता. सांगोला, अमर दिलीप चव्हाण रा.पाचेगाव ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

       सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याचे अड्डे सुरू असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागेश यमगर, सपोनि हेमंतकुमार काटकर, पोकॉ रामचंद्र जाधव, पोहेकॉ क्षीरसागर, पोकॉ चोरमले, पोहेकॉ बनसोडे, पोना कोष्टी असे पेट्रोलिंग करीत असताना लोटेवाडी शेताच्या बांधाच्या आडोशाला आनंदा उर्फ आण्णा राजाराम सावंत हा चोरुन हातभट्टी दारूची भटटी चालवित असल्याची गोपनीय बातमी मिळाली. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता आनंदा उर्फ अण्णा सावंत पळून गेला. पोलिसांनी या कारवाईत 800 लिटर गुळमिश्रीत रसायन, 20 लिटर ह.भ दारू, 3 नवसागराच्या कांडया, 1 किलो युरीया असा 16 हजार 837 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

 

         तसेच पाचेगाव बु. ता.सांगोला येथील ओढ्याच्या कडेला चिलारीच्या झुडपामध्ये मधुकर दादू चव्हाण हा अवैधरीत्या हातभट्टी दारूची भट्टी चालवत होता. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून 1200 लिटर गुळमिश्रीत रसायन, 3 लिटर ह.भ दारू, 1 किलो युरीयाचे असा 24 हजार 127 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पाचेगाव बु. ता.सांगोला येथील ओढ्याच्या कडेला पडीक रानामधे चिलारीच्या झुडपामध्ये अमर दिलीप चव्हाण हा चोरुन  हा हातभट्टी दारूची भट्टी चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 1000 लिटर गुळमिश्रीत रसायन, 4 लिटर ह.भ दारू, 3 नवसागराच्या कांडया, 1 किलो युरीया असा 20 हजार 197 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.