स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडून कमलापूर येथे " />
सांगोला प्रतिनिधी
सांगोला शहरातील जुना मेडिसिन रोड वाढेगाव नाका येथील स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत अंतर्गत कमलापूर पंचक्रोशी मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी करण्यात आले होते.या शिबिरामध्ये एम. डी.मेडिसिन डॉ. प्रमोद बोराडे व बालरोग तज्ञ डॉ.संतोष पाटील व डॉ. राहुल इंगोले व डॉ.रजनी लाटणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रमोद बोराडे यांनी प्रत्येक पेशंटला आरोग्याचे महत्त्व सांगितले. शुगर, बीपी व अल्प रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यायची याचे मार्गदर्शन केले.त्याचबरोबर बालरोग तज्ञ डॉ.संतोष पाटील यांनी लहान मुलांना सर्दी, खोकला , व थंडीच्या दिवसांमध्ये त्यांची कोणती काळजी घ्यायची व त्वचेची काळजी कशी घ्यायची याचे महत्त्व समजावून सांगितले.
शिबिरामध्ये रुग्णांची रक्तदाब तपासणी ,हृदयाचे ठोके ,शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण त्याचबरोबर गरजेप्रमाणे ईसीजी ची तपासणी करण्यात आली या शिबिरामधून निवड झालेल्या रुग्णांची महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार होणार असल्याचे माहिती डॉ. राहुल इंगोले यांनी दिली.त्याचबरोबर शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.स्पंदन हॉस्पिटल चा सर्व स्टाफ यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.