IMG-LOGO
Home आरोग्य कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात
आरोग्य

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात

November 2020 322 Views 0 Comment
IMG

नवी दिल्ली : 2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात असल्याचा इशारा यूनिसेफनं दिला आहे. 2020 प्रमाणेच पुढल्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास याचा गंभीर परिणाम एका पिढीला भोगावे लागतील असा अहवाल यूनिसेफनं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील लहान मुलांसाठी काम करणाऱ्या या संघटनेचं म्हणणं आहे की, कोरोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. कारण जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

 

140 देशांमध्ये करण्यात आला सर्वे

140 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून एका पिढीसमोर असलेल्या तीन प्रकारच्या धोक्यांसदर्भात माहिती समोर आली आहे. या धोक्यांमध्ये कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी आणि असमानतेचा समावेश करण्यात आला आहे.

 

20 लाख मुलांवर मृत्यूचं सावट

यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही तर जवळपास 20 लाख मुलांचा पुढिल 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनिसेफनं व्यक्त केलं आहे