१०८ रुग्णवाहिका ठरताहेत चाकावरचे प्रसूतिगृह..!

 

 

" /> १०८ रुग्णवाहिका ठरताहेत चाकावरचे प्रसूतिगृह..!
IMG-LOGO
Home आरोग्य १०८ रुग्णवाहिका ठरताहेत चाकावरचे प्रसूतिगृह..!
आरोग्य

१०८ रुग्णवाहिका ठरताहेत चाकावरचे प्रसूतिगृह..!

December 2022 105 Views 0 Comment
IMG

१०८ रुग्णवाहिका ठरताहेत चाकावरचे प्रसूतिगृह..!

 

 

रुग्णवाहिकेतच अडीच हजार शिशूंचा जन्म, ६८ हजार गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेचा लाभ

 

 

सांगोला (प्रतिनिधी): आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेमुळे सोलापूर जिल्ह्यात गेल्या ८ वर्षांत लाखो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. सोबतच ही रुग्णवाहिका महिलांच्या बाळंतपणासाठीही उपयोगी ठरत आहे. १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेतून ६८ हजार ३४८ महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात सुखरूपपणे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत महिलांची सुखरूप प्रसूती होऊन अडीच हजार नवजात शिशूंनी धावत्या रुग्णवाहिकेत जन्म घेतला या रुग्णवाहिका चाकावरचे प्रसूतिगृहच ठरत आहेत.

       सन २०१४ पासून सुरू झालेल्या शासकीय १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध झाली आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायी ठरत आहे. आपत्कालीन प्रसंगात मदतीला तत्काळ धावून गेल्यामुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून देण्याची किमया आरोग्य सेवेने साधली आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात ३५ रुग्णवाहिका कार्यान्वित आहेत. यापैकी दहा मिनी आयसीयू (एडव्हांस लाइफ सपोर्ट) असून, उर्वरित २५ रुग्णवाहिकांचा समावेश बेसिक लाइफ सपोर्टमध्ये होतो. रुग्णवाहिकांसोबत कायमस्वरूपी एक डॉक्टर असतो. अतिदक्षता विभागामध्ये असलेली यंत्रणा व उपचार साधनसामग्री या रुग्णवाहिकांमध्ये नागरिकांच्या जिवाला निर्माण उपलब्ध असल्याने या रुग्णवाहिका एक प्रकारच्या मिनी आयसीयूच आहेत.

     आरोग्य प्रशासन माता, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांतर्फे जनजागृती केली जात असून गर्भवती महिलांना 108 रूग्णवाहिकेची सेवा प्राधान्याने उपलब्ध करून दिली जात आहे. 2014 मध्ये 2 हजार 879, 2015 मध्ये 57 हजार 637, 2016 मध्ये 10 हजार 145, 2017 मध्ये 11 हजार 600, 2018 मध्ये 13 हजार 447, 2019 मध्ये 8 हजार 829, 2020 मध्ये 4 हजार 402, 2021 मध्ये २०२१ मध्ये ४ हजार ५१५, २०२२ मध्ये ६ हजार ७९३ असे गेल्या नऊ वर्षात ६८ हजार ३४७ गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

 

 

 

वाहन अपघात, हल्ला, भाजणे, हृदयरोग, पडणे, विषबाधा, प्रसूती, विजेचा धक्‍का, मोठे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न आणि प्रसूती अशा विविध प्रकारच्या रुग्णांना सुखरूपपणे उत्तम दर्जाच्या रुग्णालयापर्यंत दाखल करण्याचे काम 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून यशस्वी पार पडले आहे. मागील नऊ वर्षात अडीच महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाली आहे. 108 रुग्णवाहिकेची सेवा देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. - डॉ.अनिल काळे, जिल्हा समन्वयक, सोलापूर