सांगोल्यात लम्पीमुळे १४ जनावरांचा बळी..!

सांगोल्यात लम्पीमुळे १४ जनावरांचा बळी..!
IMG-LOGO
Home आरोग्य सांगोल्यात लम्पीमुळे १४ जनावरांचा बळी..!
आरोग्य

सांगोल्यात लम्पीमुळे १४ जनावरांचा बळी..!

October 2022 86 Views 0 Comment
IMG

सांगोल्यात लम्पीमुळे १४ जनावरांचा बळी..!

२४१ जनावरांना लम्पीची लागण, २१५ वर उपचार सुरू

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): लम्पीच्या आजाराने सांगोला तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. जनावरांना होणारा लम्पी हा आजार सांगोला तालुक्यात अधिक बळावताना दिसत आहे. लम्पीमुळे तालुक्यात आतापर्यंत एकूण १४ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या लम्पीची लागण झालेल्या सक्रीय जनावरांची संख्या २१५ असून आतापर्यंत १२ जनावरे या आजारातून बरी झाली आहेत. आतापर्यंत ६७ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अस्लम सय्यद यांनी दिली.

        सांगोला तालुक्यात जनावरांना लम्पी आजाराची लागण होत आहे. एकापाठोपाठ एक अनेक जनावरे लंम्पी आजाराची बळी ठरत असल्याचे चित्र आहे. सांगोला तालुक्यात आतापर्यंत १४ जनावरांचा मृत्यू झाला असून २४१ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशूवैद्यकीय अधिकारी डॉ अस्लम सय्यद यांनी दिली. तालुक्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लम्पीच्या लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. लम्पी या आजारामुळे अचानक जनावरे दगावत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी पशू संवर्धन प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. उपाययोजनाही राबवण्यात येत आहेत. तसेच जनावरांचे आठवडा बाजार बंद करण्यात आले असून जनावंराच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

 

सांगोला तालुक्यात ६७ हजार जनावरांना लंपीची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. लंपीची लागण झालेली २४१ जनावरे आढळून आली असून त्यातील १२ जनावरे बरे करण्यात यश आले आहे. लंपी बाधित २१५ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशूपालकांनी लम्पी बाधित जनावरांचे विलगीकरण करून दूर ठेवावे. पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना जनावरांसाठी घरपोच सेवा देत आहोत. - डॉ.अस्लम सय्यद, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सांगोला.