काळ आला होता ;पण वेळ आली नव्हती

सांगोला प्रतिनिधी

काळ " /> काळ आला होता ;पण वेळ आली नव्हती

IMG-LOGO
Home आरोग्य काळ आला होता ;पण वेळ आली नव्हती
आरोग्य

काळ आला होता ;पण वेळ आली नव्हती

October 2022 65 Views 0 Comment
IMG

काळ आला होता ;पण वेळ आली नव्हती

सांगोला प्रतिनिधी

काळ आला होता पण वेळ आली नव्हती यांचे अतिशय सुंदर उदाहरण आम्हाला स्पंदन हॉस्पिटल मध्ये बघायला मिळाले दि.5/10/2022 रोजी राञी 12:30 च्या सुमारास 65 वर्षीय वयोवृद्ध रुग्णास अचानक श्वसनास ञास सुरु झाला,त्यांना खूप दम लागत होता, नातेवाईकांनी पेशंटला स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे घेवून आले.हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर हॉस्पिटल मधील ऑन ड्युटी हाऊसमन डॉक्टर व स्टाफ ने त्यांना कॅज्युअलटी मध्ये घेवून बीपी, पल्स,शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण तपासले असता,बीपी लागत नव्हता,ऑक्सिजन चे प्रमाण फक्त 20%होते पेशंट ला ऑक्सिजन लावला व पेशंट चा ECG काढला असता ECG मध्ये बदल असल्याचे डॉक्टरांना जाणवले त्यांनी क्षणाचा विलंब न करता अतिशय तातडीने डॉ अतुल बोरोडे यांना संपर्क केला.डॉ बोरोडे यांनी डॉक्टरांना काही सूचना दिल्या व पेशंट आयसीयू मध्ये घेण्यास सांगितले. त्यानंतर पेशंट स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील फिजिशियन डाॅ. अतुल बोरोडे सर यांनी पेशंट तपासला असता पेशंट gasping मध्ये म्हणजे श्वास घेण्यास अतिशय त्रास होत असल्याचे जाणवले व इसीजी मध्ये अटॅक ची लक्षणे होती आणि त्याचवेळी पेशंट काडीर्याक अरेस्ट मध्ये गेला,त्यावेळी पेशंट ला CPR देवून त्याला रेसक्सिनेट करून पेशंट ला इमर्जन्सी इंट्युबेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.व पेशंट ला व्हेंटिलेटर लावण्यात आले. तरी अश्या ईमर्जन्सी परिस्थितीमध्ये कृत्रिम श्वासाचा घेतलेला निर्णय आणि लावलेले व्हेंटिलेटर व योग्यवेळी केलेले उपचार यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये स्पंदन हॉस्पिटल मधील टीमला यश आले. त्यानंतर केलेले उपचार आणि पेशंटच्या शरीराने दिलेली साथ यामुळे पेशंट तिसऱ्या दिवशी व्हेंटिलेटर काढण्यात आला 

          आज स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधून पेशंट हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होत असताना पेशंटचे नातेवाईक व स्वतः पेशंट यांना अश्रू अनावर झाले होते त्यावेळी बोलताना पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितले की स्पंदन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व सर्व स्टाफ यांनी घेतलेले सर्व निर्णय व अचूक, योग्य निदान आणि औषध उपचार यामुळे आज आम्ही आमचा पेशंट घरी घेऊन जाऊ शकलो. पेशंटचा जीव डाॅ.अतुल बोरोडे सर आणि सर्व स्पंदन हॉस्पिटल स्टाफ यांनी वाचवला त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. आमच्या पेशंंटचा जीव वाचवल्याबद्दल डाॅ. अतुल बोरोडे व सर्व स्टाफचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

       पेशंट डिस्चार्ज होत असताना सांगोला वेल्फेअर असोसिएट चा दुसरा वर्धापन दिन असल्यामुळे त्या पेशंटच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 

       यावेळी डॉ. शैलेश डोंबे,डॉ. किरण जगताप, डॉ वैभव जांगळे डॉ. योगेश बाबर, डॉ. राहुल इंगोले, डॉ. प्रतीक्षा खांडेकर, डॉ.प्रद्युम्न कुलकर्णी, विनायक लोखंडे व हॉस्पिटल मधील स्टाफ यावेळी उपस्थित होते.

 गेल्या दोन वर्षापासून सांगोला तालुक्यातील कोणतीही, कसलीही तातडीची इमर्जन्सी सेवा देण्यास स्पंदन हॉस्पिटल सुसज्ज आहे. सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व आरोग्यासाठी आमचे हॉस्पिटल कटिबद्ध आहे इथून पुढील काळामध्ये त्यामध्ये अत्याधुनिक व अधिक उत्तमोत्तम सेवा देण्यास मी व माझी टीम कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. त्यांनी पेशंटची विचारपूस करून त्यांना पुढील आयुष्यात आरोग्या विषयी घेण्याची काळजी याविषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

डॉ पियूष साळुंखे पाटील 

मॅनेजिंग अँड एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट

 

 पेशंटच्या नातेवाईकांना इमर्जन्सी आहे हे कळले पाहिजे, त्यानुसार नातेवाईकांनी त्यावर तातडीने उपचार करण्यास परवानगी दिली पाहिजे.या पेशंट मध्ये नातेवाईकांनी जर निर्णय घेण्यामध्ये वेळ केला असता तर आज हा पेशंट आपल्याला इथे दिसला नसता.इथून पुढच्या काळामध्ये अधिकाधिक चांगली सुविधा स्पंदन मध्ये उपलब्ध करून देऊ असे सांगितले.केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी नातेवाईकांचे आभार मानले.

डॉ अतुल बोराडे

M.B.B.S.DNB मेडिसिन 

स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल