सांगोल्यात पावणे चार लाख जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट " /> सांगोल्यात पावणे चार लाख जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
IMG-LOGO
Home आरोग्य सांगोल्यात पावणे चार लाख जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
आरोग्य

सांगोल्यात पावणे चार लाख जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

July 2022 81 Views 0 Comment
IMG

सांगोल्यात पावणे चार लाख जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार रोगाची ८० हजार लस उपलब्ध

सांगोला (तालुका प्रतिनिधी):पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या साथरोगांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून ८० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. सांगोला तालुक्यातील 1 लाख 90 हजार लहान-मोठी जनावरे व 1 लाख 73 हजार शेळ्या मेंढ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. जनावरांसाठी लवकरच लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) ए.ए.सय्यद यांनी दिली.

       पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. सांगोला तालुक्यातील साधारण 3 लाख 63 हजार लहान-मोठ्या जनावरांना फऱ्या, घटसर्प, आंत्रविषार या आजारांचे लसीकरण करून घेण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय दवाखान्यांना दिले आहेत. घटसर्प १५ हजार ५२५, फऱ्या ६ हजार ३३५, आंत्रविषार २९ हजार ३३७, रेबीज ३९७ अशी ८० हजार लस सांगोला पशुसंवर्धन कार्यालयास उपलब्ध झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील श्रेणी एकच्या 15 व श्रेणी 2 च्या 8 अशा 24 पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीचे वाटप करण्यात आले आहे. 

       पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता आहे. लाळ खुरकत रोगाची जनावरांना लागण होण्याचा अनुभव नेहमी येतो. फऱ्या व घटसर्पबाधित जनावरेही आढळतात. त्यामुळे या तीन मुख्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील 24 पशुवैद्यकीय दवाखान्यात लसी उपलब्ध केल्या आहेत. या लसीकरणाव्यतिरिक्त जनावरांना पाण्यातून जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लहान-मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांना जंतनाशक औषधांचे डोस देण्याच्याही सूचना दवाखान्यांना देण्यात आल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) ए.ए.सय्यद यांनी दिली.