आशिष रानडे मधूरा व भैरवीच्या गायनाने करकंबकर रसिक मंत्रमुग्ध
ग्रामीण भागातील करकंब मधील संगीत महोत्सव सांस्कृतिक चळवळीला दिशा देणारा
श्रीराम प्रतिष्ठान चे यदांचे १० वे वर्ष
श्रीराम प्रतिष्ठान यांचे वतीने रामनवमी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते.यावर्षी आशिष रानडे,व मधूरा भैरवी किरपेकर यांच गायन आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री राम प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे संतोष बुगड,विजय भागवत,संतोष टकले,प्रभाकर रसाळ,दयानंद आलेकर,पांडुरंग काटवटे,दत्तात्रय खंदारे, व गायक कलाकार यांचे शुभहस्ते तर दुसऱ्या दिवसाच दीपप्रज्वलन धनंजय इदाते,अशोक म्हेत्रे, डॉ. प्रसाद कुलकर्णी शरदचंद्र पांढरे,सतिश देशमुख,यांच्या हस्ते झाले,त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरूवातीला जयजय रामकृष्ण हरी वारकरी बीजमंत्राने वातावरण भक्तीमय झाले,नंतर भिमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या भक्तीरचना राजस सुकुमार मदनाचा पुतळा, इंद्रायणी काठी,माझे माहेर पंढरी,आरंभी वंदीन आयोध्येचा राजा,शेवटी या भैरवीने मैफिलीची सांगता केली.त्यांना तेवढीच सुंदर समर्पक साथसंगत तबला अभिजित बारटक्के, हार्मोनियम स्वानंद कुलकर्णी, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे,टाळ ज्ञानेश्वर पिसे,स्वरसाथ सिध्दार्थ निकम,अथर्व ठाकूर यांची झाली.
दुसऱ्या दिवशी कराड येथील उदयोन्मुख गायिका भगिनी मधूरा व भैरवी किरपेकर यांच्या गाण्याने झाली,सुरुवातीला राग रागेश्री द्रुत तीनतालातील बंदीशनी झाली. नंतर अजरामर नाट्यगीत,भावगीते आणि अभंग यामध्ये राधाधर जय मिलिंद ,पद्मनाभा नारायणा,कौशल्येचा राम,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,संतभार पंढरीत,हे सूरांनो,अबीर गुलाल,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा,अशा सुंदर रचना गाऊन अवघा रंग एक झाला या रचनेने वातावरण रंगून गेले. व मैफिलीची सांगता केली,याला सुंदर साथसंगत वैभव केंगार, ज्ञानेश्वर खरात,ज्ञानेश्वर दुधाणे, ज्ञानेश्वर पिसे यांनी केली. यावेळी करकंब मधील कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे,मिलिंद उकरंडे,प्रभाकर रसाळ,विजय भागवत,राजेंद्र टकले,दत्तप्रसाद दुधाणे,देवकी दुधाणे,प्रतिष्ठान चे सर्व सदस्य प्रभाकर टेके, संजीव म्हेत्रे,सुरेंद्र इदाते, दत्तात्रय इदाते, दत्तात्रय लोटके, नवनाथ आलेकर,शितल भरते, यांनी परिश्रम व सहकार्य केले.ध्वनीव्यवस्था सचिन मुजमुले,सुहास निंबाळकर, धनंजय मनमाडकर, यांनी सुरेख संभाळली.अतिशय सुंदर संगीत महोत्सव झाल्याचा भाव सर्व करकंबकर रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.