सांगोला तालुक्यात कोळा प्राथमिक आरोग्य के" /> कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राने महालसीकरणात पहिला क्रमांक ! दोन दिवसात २०१३ लोकांचे लसीकरण.
IMG-LOGO
Home आरोग्य कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राने महालसीकरणात पहिला क्रमांक ! दोन दिवसात २०१३ लोकांचे लसीकरण.
आरोग्य

कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राने महालसीकरणात पहिला क्रमांक ! दोन दिवसात २०१३ लोकांचे लसीकरण.

September 2021 106 Views 0 Comment
IMG

 

  

 

सांगोला तालुक्यात कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राने महालसीकरणात पहिला क्रमांक 

दोन दिवसात २०१३ लोकांचे लसीकरण

 

कोळा (वार्ताहर )सांगोला तालुक्यातील कोळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कोळा यांच्या विद्यामाने शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय महालसीकरण मोहीम कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी, किडेबिसरी, डोंगर पाचेगाव, जुनोनी, तिप्पेहळी, जुजारपूर, गुणपवाडी हातीद, हटकर मंगेवाडी, गौडवाडी, बुधिहाळ, पाचेगाव खुर्द सोमेवाडी,या गावांमध्ये महालसीकरण मोहीम राबवली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा दोडमनी, कोळा वैद्यकीय अधिकारी अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय कोविड लसीकरण मेगा कॅम्प घेण्यात आला. सर्व उपकेंद्राच्या कर्मचारी यांच्या योग्य नियोजनामुळे सुमारे २०१३ लोकांना "कोविंशील्ड" लस देऊन संरक्षित करण्यात आले.महालसीकरण मोहिमेमुळे सांगोला तालुक्यात कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकरणात जिल्ह्यात दुसरा तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. सदर मोहीम यशस्वी केल्या बद्दल सर्व स्तरातून कोळे आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे.

कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखान्यामध्ये महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दोन दिवसात दोन हजार तेरा महिला पुरुष व युवकांचे लसीकरण करण्यात आले.

महालसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख पंचायत समिती सदस्य नारायण तात्या पाटील पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर पत्रकार जगदिश कुलकर्णी कोळा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित गायकवाड, आरोग्य सहाय्यक पी एम शिंदे, आर एन झगडे, औषध निर्माण अधिकारी डॉ गणेश लवटे कनिष्ठ सहाय्यक दत्तात्रय घाडगे, अल्लाउद्दीन तांबोळी,आरोग्य सेविका श्रीम राणी करांडे, कविता खोत, तस्कीम मातार सविता रुपनर, रेखा केंगार, संध्या बोरगावे, एसएन भोसले, शकीरा पठाण, आरोग्य सेवक रावसाहेब बंडगर, शिवाजी गोडसे, कल्लाप्पा कांबळे, प्रयोगशाळा दूत योगेश धुरुपे, परीक्षा राजेंद्र जाधव, सारिका वडर, नंदा चव्हाण, आशा प्रवर्तक लता आलदर, सविता माळी, वंदना हेगडे, वाहन चालक मारुती बाबर, मलिकनाथ कोंपे, यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.

 

 

कोळा प्राथमिक आरोग्य अंतर्गत १८ गावामध्ये शासनाने वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती यामध्ये दोन दिवसात २०१३ लोकांनी लसीकरणात सहभाग नोंदवला हे सर्व श्रेय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व सर्व कर्मचाऱ्यांचे आहे.

~ अमित गायकवाड

वैद्यकीय अधिकारी कोळा 

 

कोळा प्राथमिक आरोग्य केंद्र महालसीकरण मोहीम नियोजनपूर्वक यशस्वी केली पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल आरोग्य अधिकारी सिस्टर नर्स सर्व कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो.

~ सचिन देशमुख

जिल्हा परिषद सदस्य कोळा