आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र नसलेल्या इतर 5 गावांमधून नागरिकांन" /> लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये नव्याने लसीकरण केंद्राची निर्मिती
IMG-LOGO
Home आरोग्य लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये नव्याने लसीकरण केंद्राची निर्मिती
आरोग्य

लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये नव्याने लसीकरण केंद्राची निर्मिती

September 2021 115 Views 0 Comment
IMG

आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र नसलेल्या इतर 5 गावांमधून नागरिकांना मिळणार लसीकरण : डॉ. सिमा दोडमणी

 

लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये नव्याने लसीकरण केंद्राची निर्मिती

 

सांगोला प्रतिनिधी :

39 आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासह तालुक्यातील लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये आज बुधवार पासुन नव्याने कोरोना लसीकरण केंद्रातून नागरिकांना लसीकरण केले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा दोडमनी यांनी दिली आहे.

सांगोला ग्रामीण रुग्णालयासह 6 आरोग्य केंद्र आणि 39 उपकेंद्राच्या माध्यमातून नागरीकांना कोरोना लसीकरण केले जात होते. मात्र अपुरा लस साठा, लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, परिणामी वयोवृद्ध नागरिकांसह महिलांना लसीकरणा पासुन वंचित रहावे लागले आहे. अनेक लसीकरण केंद्रावर वाद-विवाद यासारखा घटनाही घडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याने, व आरोग्य केंद्र उपकेंद्र वगळता गावातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आता नव्याने आज बुधवार दिनांक 8 रोजी पासून तालुक्‍यातील लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये स्वतंत्र लसीकरण केले जाणार आहे.

सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगोला तालुक्यासाठी मिळणारा लसीकरणाचा डोस हा आरोग्य केंद्र आणी उपकेंद्राच्या खालील लोकसंख्येच्या आधारे वितरित करण्यात येत आहे. तरीही गाव पातळीवर जाणारा लसीकरणाचा साठा हा पुरेसा नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच यामध्ये आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला इतर गावे जोडल्याने त्या इतर गावांमध्ये लसीकरणापासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांच्या मागणीनुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगोला तालुक्यात प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. लस साठा जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा म्हणून वरिष्ठांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जातो आहे. यामध्ये प्रत्येक गावातील नागरिकांना लसीकरण व्हावे ही भूमिका आरोग्य विभाग घेत असून, प्रशासकीय सर्व यंत्रणेच्या सहाय्याने आणि आरोग्य विभागाच्या पुढाकाराने तालुक्यातील प्रत्येक पात्र नागरिकांना लसीकरण देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे सांगत, सांगोला तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह 6 आरोग्य केंद्र आणि 39 उपकेंद्र यासह आता लोणविरे, बुरलेवाडी, सावे, नराळे आणि वाणीचिंचाळे अशा 5 गावांमध्ये स्वतंत्र लसीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत लसीकरण केंद्रावर दंगा आणि गोंधळ न करता, गाव तरी यंत्रणा आणि प्रशासकीय आरोग्य यंत्रणा यांच्या नियोजनाने व शासनाने दिलेल्या नियमानुसार लसीकरण याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा दोडमनी यांनी केले आहे.